अमित शाह, राजनाथ सिंह, फडणवीसांची पावले समान नागरी कायद्याच्या दिशेने


विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरात निवडणुकीत देशात समान नागरी कायदा लागू करण्यात येणार असल्याचे म्हटले, त्यांच्यापाठोपाठ संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही सामान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य केले त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळी महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्यात येईल, असे सूतोवाच केले. यातून देशच आता समान नागरी कायद्याच्या दिशेने चालल्याचे स्पष्ट झाले आहे. Amit Shah, Rajnath Singh and Devendra Fadanavis are in favour of comman civil code

मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो

महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संविधानाने प्रत्येक राज्याला समान नागरी कायदा लागू करण्याचे अधिकार दिले आहेत. काही कारणांमुळे आपल्या देशात हे होऊ शकले नाही. आता हा कायदा गोव्यात आहे. उत्तराखंड देखील हा कायदा लागू करणार आहे. हिमाचल करणार आहे, गुजरात देखील करणार आहे. मला वाटते हळूहळू सगळीच राज्ये समान नागरी कायदा लागू करणार आहेत.



 

महाराष्ट्रही योग्य वेळी याचा विचार करेल. आज मी याबद्दल अधिकृत घोषणा करू शकत नाही. याच कारण म्हणजे अशी कोणतीही घोषणा करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. मला असे वाटते संविधानाने आपल्यावर ही जबाबदारी टाकली आहे की, आपण आपल्या राज्यात समान नागरी कायदा आणावा, असेही फडणवीस म्हणाले.

Amit Shah, Rajnath Singh and Devendra Fadanavis are in favour of comman civil code

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात