विशेष प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच शह काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. समाजवादी पक्षाने आमदारांची पळवपाळवी सुरु केल्याने बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती भडकल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात बुवा – भतीजा शाब्दिक चकमकी राजकारणात वाढणार असून त्याची आता सुरुवात झाली आहे. Mayawati targets samajwadi party
बहुजन समाज पक्षाच्या पाच निलंबित आमदारांनी काल समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली. त्यानंतर हे आमदार ‘सप’मध्ये जाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यावर मायावती यांनी आज एकापाठोपाठ ट्विट करीत समाजवादी पक्षावर हल्ला चढविला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, फसवेगिरी, लबाडी, द्वेष आणि जातीयवाद अशा संकुचित राजकारण अशी ‘सप’ची ओळख आहे. ‘बसप’चे काही आमदार फुटून ‘सप’त जाणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांच्या मदतीने पेरल्या जात आहेत. हा निव्वळ भ्रम आहे. ‘‘
त्या म्हणाल्या की, या आमदारांचे निलंबन खूप पूर्वीच केले आहे. राज्यसभा निवडणुकीत एका दलित उमेदवाराचा पराभव करण्यासाठी या आमदारांनी समाजवादी पक्ष आणि एका उद्योजकाबरोबर हातमिळवणी केल्याने त्यांच्यावर ही कारवाई केली होती. समाजवादी पक्षाची प्रतिमा कायमच दलितविरोधी असून त्यात सुधारणा करण्याची गरज त्यांना वाटत नाही. म्हणून ‘बसप’ने सुरू केलेली कल्याणकारी कामे हा पक्ष सत्तेवर असताना बंद केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App