हिमाचल प्रदेश, जम्मू- काश्मीरमध्ये ढगफुटी, मोठ्या प्रमाणात जुवूत व वित्त हानी


विशेष प्रतिनिधी

जम्मू – जम्मू-काश्मीकर आणि हिमाचल प्रदेशावर देखील अतिवृष्टीचे संकट कोसळले असून विविध ठिकाणांवर ढगफुटीमुळे झालेल्या भूस्खलनाने मोठी जिवीत व वित्तहानी झाली आहे.Massive rain in Jammu Kashmir and Himachal pradesh

या अतिवृष्टीची माहिती मिळताच ‘एनडीआरएफ’च्या तुकड्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून अनेक ठिकाणांवर मदत आणि बचाव कार्याला वेग आला आहे. काही ठिकाणांवर ढिगारे हटविण्याच्या कामाला वेग आला आहे.हिमाचल प्रदेशात विविध ठिकाणांवर ढगफुटीसदृश्यग पाऊस कोसळल्याने पूर येऊन नऊजणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून अन्य सात जण बेपत्ता आहेत. उदयपूर भागामध्ये तोझिंग नुल्लाह येथे ढगफुटी झाल्याने लाहौल स्पिती येथे आलेल्या पुरात सात जण वाहून गेले.

चंबा जिल्ह्यामध्ये दोघाजणांचा मृत्यू झाल्याचे समजते. कुलू जिल्ह्यामध्ये चारजण मरण पावल्याची शक्यता वर्तविली जात असून यामध्ये दिल्लीतील एका पर्यटकासह जलविद्युत प्रकल्पावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

उदयपूरमध्ये बारा कामगार वाहून गेल्याची भीती वर्तविली जात आहे. लाहौल-स्पितीमध्ये अनेक रस्त्यांचे मोठे नुकसान झाले असून विविध ठिकाणांवर भूस्खलन झाल्याने साठपेक्षाही अधिक वाहने अडकून पडल्याचे वृत्त आहे.

Massive rain in Jammu Kashmir and Himachal pradesh

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण