उत्तर प्रदेशात काँग्रेस स्वबळावर एकटी लढेल; प्रियांका गांधी यांची बुलंदशहर मधून घोषणा


वृत्तसंस्था

बुलंदशहर : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांक गांधी यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीसंदर्भात आज अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारविरुद्ध काँग्रेस पक्ष एक हाती आणि एकाकी लढत देईल, असे प्रियांका गांधी यांनी बुलंदशहर मधल्या जाहीर सभेत स्पष्ट केले आहे.Many party workers asked me not to forge alliance with any party for the upcoming Assembly election

त्याआधी त्यांनी आज बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांची सांत्वन भेट घेतली. मायावती यांच्या मातोश्रींचे काल निधन झाले आहे. याबद्दल मायावती यांचे सांत्वन करण्यासाठी प्रियांका गांधी त्यांच्याकडे गेल्या होत्या.

या भेटीनंतर प्रियंका गांधी यांनी बुलंदशहरचा दौरा केला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत प्रियांका गांधी म्हणाल्या, की मला उत्तर प्रदेश मधल्या प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने असे सांगितले आहे, की आपण काँग्रेस पक्षाला पुनर्वैभव प्राप्त करून घ्यायचे असेल तर एकट्याच्या बळावर योगी आदित्यनाथ सरकारशी टक्कर घेतली पाहिजे. मी देखील त्यांना हे आश्वासन देऊ इच्छिते की काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशात स्वबळावर एकाकी टक्कर देईल. कोणत्याही पक्षाशी युती अथवा आघाडी करणार नाही. विधानसभेच्या प्रत्येक जागेवर काँग्रेसचा उमेदवार आपल्या चिन्हावर उभा असेल. आपण सगळे काँग्रेस कार्यकर्ते मिळून पक्षाला विजयी करू, असा आत्मविश्वास प्रियांका गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये जागविला आहे.

एकीकडे प्रियंका गांधी यांनी बुलंदशहरचा दौरा केला तर दुसरीकडे अखिलेश यादव यांनी कुशीनगरचा दौरा केला. समाजवादी विजय यात्रेवर ते निघाले आहेत. कुशीनगर मधून त्यांनी भाजप आणि योगी आदित्यनाथ सरकारवर तोफा डागल्या. भाजप अहंकारी पक्ष असल्याची टीका त्यांनी केली. परवाच ते योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमध्ये होते.

प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सारखे महत्त्वाचे विरोधी पक्षांचे नेते योगी आदित्यनाथ सरकारवर एकापाठोपाठ एक तोफा डागताना दिसत आहेत. पण भाजपच्या विरोधात एकत्र येण्याची मात्र या दोन्ही पक्षाच्या नेत्यांची तयारी दिसत नाही.

Many party workers asked me not to forge alliance with any party for the upcoming Assembly election

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात