दिवाळीच्या मुहूर्तावर ममतांची आता गोव्यावर स्वारी!!; तीन दिवस गोव्यात मुक्काम


वृत्तसंस्था

कोलकत्ता : पश्चिम बंगाल तिसऱ्यांदा जिंकून झाले. मध्यंतरी दिल्लीवर पाच दिवसांची स्वारी झाली. त्यानंतर आसाम, त्रिपुरामध्ये काँग्रेस भेदून झाली. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम भारतावर लक्ष केंद्रित केले असून त्यातला पहिला पाडाव गोवा असणार आहे.Mamata invades Goa on the eve of Diwali !!; Stay in Goa for three days

दिवाळीच्या ऐन मुहूर्तावर ममता बॅनर्जी येत्या 28 ऑक्टोबर पासून गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. त्या 1 नोव्हेंबरपर्यंत गोव्यात तीन दिवस गोव्यातल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्या तृणमूल काँग्रेसच्या संघटनात्मक पायाभरणीचा प्रारंभ करणार आहेत.यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी आसाममध्ये अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष आणि माजी खासदार सुष्मिता देव यांना काँग्रेसमधून फोडून तृणमूल काँग्रेसमध्ये सामील केले. त्यांना आसाममध्ये तृणमूल काँग्रेसची महत्त्वाची जबाबदारी दिली.

त्रिपुरामध्ये ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी लक्ष घालून भाजप विरोधात आघाडी उघडली आहे. त्याच प्रमाणे गोव्यात देखील ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री लुईजिनो फालेरो यांना फोडून काँग्रेसमध्ये समाविष्ट करून घेतले आहे गोव्यात तृणमूल काँग्रेसची पक्षबांधणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.

तृणमूल काँग्रेसच्या पक्षसंघटना बांधणीसाठीच ममता बॅनर्जी तीन दिवस गोव्यात तळ ठोकून बसणार आहेत. गोवा विधानसभेच्या निवडणुकीत त्या भाजप आणि काँग्रेस यांच्यासमोर आव्हान उभे करण्याच्या मन:स्थितीत आहेत. अर्थात त्यांचा सामना भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व पक्षांशी होणार असल्याने गोव्यातले आव्हान ममता बॅनर्जी यांच्यासाठी सुरुवातीला तरी सोपे असणार नाही.

तरी देखील त्यांची भिस्त आपल्या वैयक्तिक करिष्म्यावर आणि लुईजिनो फालेरो यांच्याशी संबंधित ख्रिश्चन मतांवर असणार आहे. काँग्रेससह अन्य पक्षांमधून स्थानिक नेते गळाला लावण्याचा देखील ममता बॅनर्जी यांचा प्रयत्न असणार आहे.

Mamata invades Goa on the eve of Diwali !!; Stay in Goa for three days

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण