ऐन दिवाळीच्या दिवसांत सामान्यांना थोडा दिलासा; खाद्यतेलाच्या किंमतीत घटल्या


प्रतिनिधी

मुंबई : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यात आता भाज्यांचे भावसुद्धा गगनाला भिडले आहेत. पण आता खाद्यतेलांचे दर कमी झाल्याने सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.A little relief to the common man on the days of  Diwali

दिवाळीच्या उंबरठ्यावर खाद्यतेले स्वस्त झाल्याने दिवाळीआधीच सर्वसामान्यांचे तोंड गोड झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात व्यापार निर्बंध कठोर असल्याने, तसेच व्यापार ठप्प झाल्याने खाद्य तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. पण केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे खाद्य तेलांच्याची किंमती कमी झाल्याचे पहायला मिळत आहे.


Edible Oil Prices : सरकारने खाद्य तेलांवरील आयात शुल्क घटवले, किमतींमध्ये एवढी झाली कपात


दिवाळीच्या सणाला फराळ तसेच रोषणाई करण्यासाठी तेलाच्या मागणीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली. यामुळे केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या साठ्यावर निर्बंध घालून सोयाबीन, सुर्यफूल, पाम तेलावरील कृषी उपकर आणि सीमाशुल्क कमी केले आहे. यामुळेच सोयाबीन आणि सुर्यफूल या तेलांच्या दरांत १५ किलोच्या डब्यामागे १०० रुपयांची घसरण झाली आहे.

– खाद्यतेलाची सर्वाधिक मागणी

भारतात सणवार आणि  विविध खाद्यसंस्कृतीमुळे खाद्यतेलाला सर्वाधिक मागणी आहे. दरवर्षी १५० लाख टन तेल आयात केले जाते, तर ८० लाख टन तेलाची निर्मिती भारतात केली जाते.

A little relief to the common man on the days of  Diwali

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात