MALEGAON : मालेगावात पुन्हा एकदा पोतेभर धारदार तलवारी सापडल्याने खळबळ ; दोघे अटकेत


मालेगाव शहरातील नवापुरा भागातील वरळी रोड परिसरातून अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथक व शहर पोलिसांनी संयुक्तरीत्या टाकलेल्या छाप्यात पोत्यात भरलेल्या ३० तलवारी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी तिघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.MALEGAON: Excitement over the discovery of a sharp sword in Malegaon once again; Both arrested


विशेष प्रतिनिधी

मालेगाव : मालेगाव शहरातील इस्लामपुरा या भागातील वरळी रोड परिसरात 30 धारदार तलवारी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा तलवारींचा साठा विशेष पोलीस पथक आणि शहर पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.मालेगाव शहरातील गुन्हेगारी विरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. वरळी रोड भागात असलेल्या एका शॉपिंग सेंटरधल्या एका दुकाना तलवारी लपवण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवींना मिळाली.



त्यानंतर विशेष पोलीस पथकाचे उपनिरीक्षक रामेश्वर घुगे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने शुक्रवारी दुपारी छापा मारला आणि दुकानाची झडती घेतली.या झडतीत 37 हजार 500 रूपये किंमतीच्या 30 धारदार तलवारी सापडल्या. त्या जप्त करण्यात आल्या आहेत.

या तलवारी बाळगाणऱ्या मोहम्मद महबुब अब्दुल अन्सारी या 23 वर्षीय युवकाला आणि मोहम्मद बिलाल शब्बीर या 22 वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद अन्सारी हा कमालपुरा भागात तर शब्बीर अहमद हा इस्लामपुरामध्ये राहतो.

या दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.या दोघांनी या तलवारी नेमक्या कशासाठी आणि कोणत्या हेतून आणल्या याचा शोध आता पोलीस घेत आहेत. त्याच अनुषंगाने या दोघांची चौकशीही सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी शहरात बंदच्या पार्श्वभूमीवर हिंसक घटना घडली होती. त्या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच तलवारींचा साठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

MALEGAON: Excitement over the discovery of a sharp sword in Malegaon once again; Both arrested

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात