महिंद्रा कंपनीचा फॅमिली सपोर्ट, कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना पाच वर्षांचा पगार देणार


महिंद्रा अ‍ॅँड महिंद्रा कंपनीने फॅमिली सपोर्ट पॉलिसी आणली आहे. कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना पाच वर्षांचा पगार देणार आहे. महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनीश शाह यांनी आपल्या २५ हजार कर्मचाऱ्याना पत्र लिहून ही माहिती दिली आहे.


प्रतिनिधी

नवी दिल्ली : महिंद्रा अ‍ॅँड महिंद्रा कंपनीने फॅमिली सपोर्ट पॉलिसी आणली आहे. कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना पाच वर्षांचा पगार देणार आहे. महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनीश शाह यांनी आपल्या २५ हजार कर्मचाऱ्याना पत्र लिहून ही माहिती दिली आहे. Mahindra Family Support, will pay five years salary to heirs of deceased employees

महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी फॅमिली सपोर्ट पॉलिसी आणली आहे. यामध्ये कंपनी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रत्येक मुलाला वषार्काठी दोन लाख रुपयांपर्यंतची मदत करणार आहे. कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला त्या कर्मचाचे पाच वर्षांचे वेतन देण्याचे जाहीर केले आहे.



कुटुंबांवरील ओझे कमी करण्याचा प्रयत्नकोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे पीडित असलेल्या कुटुंबांवरील ओझे थोडे कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. काही कुटुंबांना आपल्या प्रिय व्यक्तीच्या अचानक निधनाचा सामना करावा लागला आहे. त्याचवेळी घर चालवण्याची अनपेक्षित जबाबदारी स्वीकारावी लागली आहे. अशा वेळी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्या मदतीसाठी आम्ही सज्ज आहोत, असे अनीश शहा यांनी या पत्रात म्हटले आहे

Mahindra Family Support, will pay five years salary to heirs of deceased employees

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात