लॉकडाउनमुळे गरीब महिलांच्या आहाराला बसला मोठा फटका, पौष्टिक खाद्यपदार्थांचा झाला अभाव


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन – देशभरात गेल्या वर्षी कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा महिलांच्या पोषणावर विपरित परिणाम झाल्याचा दावा अमेरिकी संशोधकांच्या गटाने केला आहे. Lockdown affects very seriously on women’s health

टाटा-कॉर्नेल कृषी आणि पोषण संस्थेने उत्तर प्रदेशातील महाराजगंज, बिहारमधील मुंगेर व ओडिशातील कंधमाल आणि कलाहंडी या आर्थिकदृष्ट्या मागास जिल्ह्यांत याबाबत सर्वेक्षण केले. यावेळी, मे २०१९ च्या तुलनेत मे २०२० मध्ये महिलांच्या आहारावर परिणाम झाल्याचे आढळले.



विशेषत: महिलांच्या आहारातील भाज्या, फळांसह मटन, अंडी या मांसाहारी पदार्थांचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसले. केंद्राच्या अन्नधान्याच्या विशेष सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस), थेट लाभ हस्तांतरण, व अंगणवाड्यांच्या माध्यमातून अनुक्रमे ८०, ५० आणि ३० टक्के घरांमध्ये अन्नधान्य पोचविण्यात आले, असा निष्कर्ष संशोधकानी काढला.

संशोधकांच्या मते, आर्थिक टंचाईचा महिलांना बसणारा अधिक फटका, मुख्य धान्य केंद्रित सुरक्षा कार्यक्रमाचा प्रभाव आणि वैविध्यपूर्ण पौष्टिक खाद्यपदार्थांची उपलब्धतता व ते मिळविण्यावर आलेले निर्बंध आदींमुळे महिलांच्या आहारवर विपरित परिणाम झाला.

महिलांच्या आहार कार्यक्रमाला चालन द्या!

धोरणकर्त्यांनी कोरोना साथीचा विषम परिणाम आणि अशा प्रकारच्या महिलांच्या आहारावर परिणाम करणाऱ्या घटना ओळखायला हव्यात. त्याचप्रमाणे, महिलांच्या व इतर दुर्लक्षित गटाच्या आहाराच्या गरजा भागविणाऱ्या कार्यक्रमाला चालना द्यायला हवी, असे निरीक्षणही संशोधकांनी नोंदविले आहे.

Lockdown affects very seriously on women’s health

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात