ट्रिपल तलाक विरोधी कायद्यामुळे देशात तीन तलाक प्रकरणांमध्ये मोठी घट; मुक्तार अब्बास नक्वी यांचे प्रतिपादन


ट्रिपल तलाक विरोधी कायद्याच्या वर्धापनदिनी उद्या १ ऑगस्टला मुस्लिम महिला अधिकार दिन


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतात ट्रिपल तलाक विरोधी कायदा अस्तित्वात आल्यानंतर तीन तलाकच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. मुस्लिम महिलांना त्यांच्या घटनात्मक मूलभूत अधिकारांची जाणीव झाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्यांक कल्याण मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी केले आहे. Large drop in three divorce cases in the country due to anti-triple divorce law

ट्रिपल तलाक विरोधी कायद्याच्या वर्धापन दिनी उद्या १ ऑगस्ट रोजी मुस्लिम महिला अधिकार दिन साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नक्वी यांनी बोलत होते.


एप्रिलच्या मध्यात महाराष्ट्रात होणारा कोरोनाचा विस्फोट, संशोधकांचे भाकीत, मेच्या अखेरपासून बाधितांचे प्रमाण घटणार


१ ऑगस्ट 2019 रोजी ट्रिपल तलाक विरोधी कायदा अस्तित्वात आला. याला उद्या 2 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने केंद्र सरकारने “मुस्लिम महिला अधिकार दिवस” साजरा करण्याचे ठरविले आहे. 2019 मध्ये मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर त्यांनी अत्यंत महत्त्वाचे पाऊल टाकत ट्रिपल तलाक विरोधी कायदा संसदेत मंजूर करून घेतला.

ट्रिपल तलाक विरोधी कायदा मंजूर झाल्यानंतर तीन तलाक प्रकरणांमध्ये भरपूर कमी आली आहे. मुस्लिम महिलांना त्यांच्या घटनात्मक मूलभूत अधिकारांची जाणीव झाली आहे. केंद्र सरकार मुस्लीम महिलांच्या कल्याणासाठी तसेच त्यांनी आत्मनिर्भर बनावे यासाठी विविध योजना राबवते आहे. यातून त्यांचा आत्मविश्वास वाढीला लागला आहे, असेही नक्वी यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या वतीने होणाऱ्या उद्य कार्यक्रमात केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांच्या बरोबरच केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि स्मृती इराणी हे दोन नेते देखील सहभागी होणार आहेत.

Large drop in three divorce cases in the country due to anti-triple divorce law

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात