विशेष प्रतिनिधी
मुंबई : साहित्य क्षेत्रामध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणे ही खूप मोठी मानाची गोष्ट मानली जाते. साहित्य अकादमीचे २०२० सालचे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. पैकी भाषांतरासाठीचा पुरस्कार साहित्यिका आणि अनुवादिका सोनाली नवांगुळ यांना जाहीर करण्यात आला आहे. सोनाली यांनी अनुवादित केलेल्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या पुस्तकाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पन्नास हजार रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
Kolhapur based writer sonali navangul won 2020 sahitya academy award for best translated book
साहित्य अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समितीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये देशातील चोवीस पुस्तकांना साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर करण्याचे ठरवण्यात आले होते. तमिळ भाषेतील ‘इंद्रम जम्मक्लीन कथाई’ या कादंबरीचा अनुवाद म्हणजे ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ ही कादंबरी आहे.
साहित्य अकादमीने “उद्या”ला पुरस्कार जाहीर केला; नंदा खरेंनी विनम्रतेने नाकारला
सोनाली यांनी आजपर्यंत सात पुस्तकं लिहिली आहेत. त्यातील चार अनुवादित पुस्तके आहेत. अनुवादित पुस्तकांमध्ये मध्यरात्रीनंतरचे तास, ड्रीम रनर, वरदान रागाचे, वारसा प्रेमाचा ही चार पुस्तकं आहेत. याशिवाय ‘स्वच्छंद’ हे ललित लेखण, ‘जॉयस्टिक’ हा गोष्टींचा संग्रह तसेच ‘मेधा पाटकर’ हे मुलांसाठीचं माहितीपर पुस्तक हे त्यांचे प्रकाशित साहित्य आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App