साहित्य अकादमीने “उद्या”ला पुरस्कार जाहीर केला; नंदा खरेंनी विनम्रतेने नाकारला

वृत्तसंस्था

नागपूर : साहित्य अकादमीने २०२० सालासाठी विविध भाषांमधील साहित्य पुरस्कार आज जाहीर केले. यात मराठीसाठी प्रख्यात साहित्यिक नंदा खरे यांच्या “उद्या” या २०१५ साली प्रकाशिक झालेल्या कादंबरीला पुरस्कार जाहीर झाला. पण तो नंदा खरे यांनी विनम्रतेने नाकारला आहे. Nanda Khare rejects sahitya akademi award for his marathi novel “UDYA”

आजवर समाजाने मला भरपूर दिले आहे, त्यामुळे मी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त करतो पण तो पुरस्कार विनम्रतेने नाकारतो आहे, असे नंदा खरे यांनी स्पष्ट केले आहे. ‘आबाची गोष्ट’ या आबा गोविंदा महाजन यांच्या लघुकथासंग्रहास बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समितीत मराठीसाठी सतीश काळसेकर, वसंत आबाजी डहाके आणि डॉ. निशिकांत मिरजकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.नंदा खरे यांच्या “उद्या” कादंबरीत मोठ्या शहरातील आधुनिक जगात जगणाऱ्या पात्रांपासून अगदी गडचिरोलीतील आदिवासी भागात जगणाऱ्या गरीब पात्रांच्या जीवनाचा वेध घेतला आहे.

  • अब्जाधीशांची संपत्ती कशी वाढली…

साहित्य अकादमीचा पुरस्कार नाकारला असला तरी, यापुढेही लेखन करत राहणार आहे. खासकरून कोरोना काळात जेव्हा जगातील बहुतांशी जनता हाल सहन करत होती. तेव्हा काही मोजक्या अब्जाधीशांची संपत्ती कित्येक पटींनी वाढली आहे. हे आधुनिक बाजार व्यवस्थेत कसे काय घडते… याचा वेध घेत या नव्या बाजार व्यवस्थेचे विविध पैलू समोर आणण्याचे प्रयत्न आपल्या लेखनातून करणार असल्याचे नंदा खरे यांनी सांगितले.

नंदा खरे हे विविध कालपटांचा वेध घेणारे विज्ञान साहित्यिक मानले जातात. त्यांच्या अंताजीची बखर, बखर अंतकाळाची या मराठेशाहीच्या अंतावरील कादंबऱ्या गाजल्यात. इंडिका – भारतीय उपखंडाचा नैसर्गिक इतिहास, कापूसकोंड्याची गोष्ट ही अनुवादित पुस्तकेही चर्चेची ठरली. त्यांचे अन्य साहित्यही प्रसिध्द आहे.

Nanda Khare rejects sahitya akademi award for his marathi novel “UDYA”

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*