Mirabai Chanu Profile : मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक जिंकून दिले आहे. एकूण 492 किलो वजन उचलून तिने 49 किलो वजन गटात रौप्यपदक जिंकले. अशाप्रकारे देशाला 21 वर्षांनंतर वेटलिफ्टिंगमध्ये ऑलिम्पिक पदक मिळाले आहे. यापूर्वी 2000 मधील सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने कांस्यपदक जिंकले होते. 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये मीराबाईला एकदाही योग्य प्रकारे वजन उचलता आले नव्हते, तेव्हा तिचे सर्व प्रयत्न अपात्र ठरले होते. यामुळे मीराबाईचे आजचे हे यश खूप महत्त्वाचे आहे. Know About Mirabai Chanu Profile Chanu Wins Indias First Medal in Tokyo Olympics 2021
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक जिंकून दिले आहे. एकूण 492 किलो वजन उचलून तिने 49 किलो वजन गटात रौप्यपदक जिंकले. अशाप्रकारे देशाला 21 वर्षांनंतर वेटलिफ्टिंगमध्ये ऑलिम्पिक पदक मिळाले आहे. यापूर्वी 2000 मधील सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने कांस्यपदक जिंकले होते. 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये मीराबाईला एकदाही योग्य प्रकारे वजन उचलता आले नव्हते, तेव्हा तिचे सर्व प्रयत्न अपात्र ठरले होते. यामुळे मीराबाईचे आजचे हे यश खूप महत्त्वाचे आहे.
ऑलिम्पिकमध्ये जाण्यापूर्वी मीराबाईंनी ‘दै. भास्कर’ला म्हटले होते की, मी टोकियो ऑलिम्पिकमध्ये नक्कीच पदक जिंकेन. कारण मला ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. मी माझे पहिले ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात अयशस्वी ठरले होते. तेव्हा अनुभवाच्या कमतरतेमुळे मी पदक जिंकू शकले नव्हते.
यावर्षी एप्रिलमध्ये झालेल्या ताश्कंद एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये मीराबाई चानूने स्नॅचमध्ये 86 किलो वजन उंचावल्यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये 119 किलो वजन उचलून विश्वविक्रम नोंदविला. एकूण 205 किलो वजनासह ती तिसऱ्या स्थानावर राहिली. यापूर्वी क्लीन अँड जर्कचा जागतिक विक्रम 118 किलो होता. 49 किलोमध्ये वजनी गटात चानूची वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरी एकूण 203 किलो (88 किलो व 115 किलो) होती, जी तिने गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय स्पर्धेत केली होती.
मीराबाई मणिपूरच्या इम्फाळची आहे. स्थानिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत वयाच्या 11व्या वर्षी तिने वेटलिफ्टिंगमधील पहिले सुवर्णपदक जिंकले. जागतिक व कनिष्ठ आशियाई स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय पातळीवर मीराबाईने वेटलिफ्टिंग कारकीर्दीची सुरुवात केली. कुंजाराणी देवी यांनी ती आपला आदर्श मानते.
वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी मीराबाई ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे. 2017 मध्ये (49 किलो वजनी गट) तिने ही कामगिरी केली. 2014च्या ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये 49 किलो वजनी गटात तिने रौप्य पदक जिंकले. 2018 राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाईने सुवर्णपदक जिंकले होते.
मीराबाईला 2018 मध्ये पाठदुखीचा त्रास उद्भवला होता. तथापि, त्यानंतर तिने 2019 थायलंड वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून पुनरागमन केले आणि चौथ्या क्रमांकावर राहिली. मग तिने प्रथमच 200 किलोपेक्षा जास्त वजन उचलले. चानू म्हणते की, त्यावेळी तिला भारत सरकारचं पूर्ण सहकार्य मिळालं. मला अमेरिकेत उपचारांसाठी पाठवण्यात आलं. त्यानंतर मी पुनरागमन तर केलेच, पण माझ्या कारकीर्दीतील सर्वात जास्त वचन उचलण्यातही यशस्वी ठरले.
Know About Mirabai Chanu Profile Chanu Wins Indias First Medal in Tokyo Olympics 2021
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App