ट्विटर इंडियाच्या एमडींना न्यायालायाचा दिलासा, उत्तर प्रदेश पोलिसांवर कडक ताशेरे


विशेष प्रतिनिधी

बंगळूर : ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वउरी यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलासा देतानाच उत्तरप्रदेश पोलिसांनी त्यांना खटल्याच्या सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी बजावलेली नोटीस रद्दबातल ठरविली आहे. Twitter Indias Md get relief

माहेश्वणरी यांना ही नोटीस पाठविण्यामागे यूपी पोलिसांचा हेतू चांगला नव्हता. केवळ बळाचा वापर करून त्यांनी ही कारवाई केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मध्यंतरी ट्‌विटरवर काही आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ निर्माण झाली होती, यूपीत याला जातीय रंग मिळाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.



न्या. जी. नरेंदर यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने हे आदेश देतानाच यूपी ‘कलम-४१ (अ)’ हे छळवणुकीचे साधन बनता कामा नये असे सांगितले. या प्रकरणाची मागील अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू असल्याच्या मुद्द्याकडे देखील न्यायालयाने लक्ष वेधले. गाझियाबाद पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर माहेश्वदरी यांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Twitter Indias Md get relief

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात