गांधी आणि ठाकरे परिवाराच हवाला ऑपरेटर एकच, त्याच्या माध्यमतून बेनामी पैसे वळवित असल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप


विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे परिवार एकाच हवाला ऑपरेटरच्या माध्यमातून आपले बेनामी पैसे वळवत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.Kirit Somaiya accuses Gandhi and Thackeray family of being the only hawala operator, diverting money anonymously through him

सोमय्या म्हणाले,उदयशंकर महावार असं या हवाला ऑपरेटरचं नाव आहे. ठाकरे आणि गांधी परिवाराचे हवाला व्यवहार तोच सांभाळतो. यशवंत जाधव बेनामी पैसे वळवायचे. त्यात उदयशंकर महावार या हवाला ऑपरेटरची महत्त्वाची भूमिका असल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय.मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर इन्कम टॅक्सनं धाडी घातल्या. त्यात आता सोमय्यांनी हवाला रॅकेटचे गंभीर आरोप केलेत.ठाकरे कुटुंबीयांना लवकरच ईडीची नोटीस येणार असल्याचे संकेत नारायण राणेंनी दिले होते. त्यामुळं शिवसेना चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष जाधव हे कंत्राटदारांकडून मिळणारे रोख पैसे प्रधान डिलर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून इतरत्र वळते करायचे. ही कंपनी बंद पडली होती. मात्र, या कंपनीच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकून त्याचे धनादेश यशवंत जाधव मिळवत असत.

उदयशंकर महावार हा हवाला ऑपरेटर हे सगळे आर्थिक व्यवहार करून देत होता. यशवंत जाधव यांनी शिवसेनेच्या नेत्यांना भ्रष्टाचार आणि बेनामी पैसे कसे वळवायचे याचा आदर्श घालून दिला होता. त्याच पद्धतीने ठाकरे कुटुंबीय आणि अनिल परब यांनी भ्रष्टाचार केला.

या सगळ्यात उदयशंकर महावार या हवाला आॅपरेटरची महत्त्वाची भूमिका आहे. एवढेच नव्हे तर उदय महावार हा ठाकरे आणि गांधी या दोन्ही परिवारांसाठी काम करायचा. कदाचित सोनिया गांधी यांनीच उद्धव ठाकरे यांना उदय महावार याची ओळख करू दिली असेल, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

Kirit Somaiya accuses Gandhi and Thackeray family of being the only hawala operator, diverting money anonymously through him

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती