केरळ हायकोर्ट : कोरोना प्रमाणपत्रावरुन पंतप्रधान मोदींचा फोटो हटवण्याची मागणी करणारी याचिका रद्द


न्यायमूर्ती एन. नागरेश यांनी या याचिकेला अनुमती देण्यासंदर्भातील व्यापक विचार करता म्हटलं की, हा एक धोकादायक प्रस्ताव आहे. Kerala High Court quashes petition seeking removal of PM Modi’s photo from Corona certificate


विशेष प्रतिनिधी

तिरुवनंतरपुरम : लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान मोदींचा फोटो यावर सगळीकडेच चर्चा सुरू आहे.मग याबाबत चांगल्या आणि वाईट दोन्ही पद्धतीने चर्चा सुरू आहे.दरम्यान लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो का ? असा सवाल करत आहेत.अनेकांनी यावर आक्षेप देखील नोंदवला आहे.अनेकांनी तर अशी मागणी केली आहे की , मोदी सगळीकडे फक्त स्वत:चं मार्केटिंग करतात, किमान लस प्रमाणपत्राला तरी त्यांनी सोडायला हवं होतं.

लसीकरण प्रमाणपत्रावरुन मोदींचा फोटो हटवण्यात यावा, अशी मागणी करणारी एक याचिका केरळ हायकोर्टात दाखल करण्यात आली होती.या याचिकेत केरळ मधील एका व्यक्तीने लसीकरण प्रमाणपत्रा वरील मोदींच्या फोटोवर आक्षेप घेतले आहे. सरकारला पुरेश्या कोरोना लस उपलब्ध करून देता न आल्याने
मी स्वतः पैसे खर्च करून लस घेतली आहे. त्यामुळे प्रमाणपत्रावर फोटो छापून श्रेय घेण्याचा मोदींना कोणताही अधिकार नाही. तसेच त्यांनी याबाबत थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करत मोदींचा फोटो हटवण्याची मागणी केली आहे. पिटर म्यालीपरंबिल असे त्या व्यक्तीचे नाव असून ते माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत.



दरम्यान याचिकेनंतर यावर काल ( मंगळवारी ) सुनावणी झाली.या सुनावणीनंतर केरळ हायकोर्टाने कोरोना प्रमाणपत्रावरुन पंतप्रधान मोदींचा फोटो हटवण्याची मागणी करणारी याचिका रद्द केली आहे. न्यायमूर्ती एन. नागरेश यांनी या याचिकेला अनुमती देण्यासंदर्भातील व्यापक विचार करता म्हटलं की, हा एक धोकादायक प्रस्ताव आहे. कारण उद्या कुणीतरी इथं येऊन असा प्रस्ताव टाकू शकतो की मला महात्मा गांधी पसंद नाहीयेत आणि त्यामुळे आपल्या चलनी नोटांवरुन त्यांचा फोटो हटवून टाकण्यात यावा. है पैसे म्हणजे माझ्या रक्ताचं आणि घामाचं चीज आहे, त्यामुळे या पैशांवर हा चेहरा नको, असा दावा करुन ही मागणी केली जाऊ शकते. तेंव्हा काय होईल?

यावर वकिल अजित रॉय यांनी उत्तर दिलं की, महात्मा गांधींची प्रतिमा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार चलनावर छापण्यात आली आहे. तर पंतप्रधान मोदींची प्रतिमा कोणत्याही प्रकारच्या संवैधानिक तरतुदीनुसार छापण्यात आलेली नाहीये.ASGने याय प्रकरणी साक्ष दाखल करण्यासाठी आणखी वेळ मागितली. त्यानुसार न्यायालयाने सुनावणी 23 नोव्हेंबरला होणार असल्याचे सांगितले.

Kerala High Court quashes petition seeking removal of PM Modi’s photo from Corona certificate

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात