धनंजय मुंडेंचे बंगले, फार्महाऊस जाहीर करीत करूणा धनंजय मुंडे यांचा ९०० कोटींच्या नव्या आमदार निवासाविरोधात एल्गार, सरकारचे काढले वाभाडे


धनंजय मुंडे यांच्याबरोबरच्या प्रेमकथेच्या पुस्तकाचेही केले प्रमोशन


विशेष प्रतिनिधी

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे – पवार मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडे यांची पत्नी करूणा धनंजय मुंडे यांनी आज धनंजय मुंडे यांचे बंगले, फ्लॅट, फार्महाऊस यांची संख्या जाहीर करीत ठाकरे – पवार सरकारच्या प्रस्तावित नव्या आमदार निवासाविरोधात एल्गार पुकारला. karuna dhananjay munde declears dhananjay munde`s benglows, flats, farm houses and oppsed 900 cr MLA hostel

फेसबुक लाइव्ह करीत त्यांनी धनंजय मुंडे यांनी एवढ्या वर्षात आमदार, मंत्री राहूनही मराठी माणसासाठी काहीच केले नसल्याचा खळबळजनक आरोप लावला. विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना संबोधित करीत करूणा धनंजय मुंडे यांनी धनंजय मुंडे आणि सरकारचे साध्या – सोप्या भाषेत वाभाडे काढले.



फेसबुक लाइव्हमध्ये बोलताना करूणा धनंजय मुंडे म्हणाल्या, की मी एक आमदाराची पत्नी आहे. धनंजय मुंडे माझे पती हे मंत्री आहेत. ते जेव्हा विधानपरिषदेवर आमदार होते तेव्हापासून त्यांचे परळीमध्ये तीन बंगले आहेत. एक फार्म हाऊस आहे, पुण्यात दोन बंगले आणि मुंबई दोन फ्लॅटही आहेत. एवढेचच काय तर आम्हाला सरकारी बंगलाही मिळाला आहे. त्यांच्या रिनोवेशनची गरज नाही. त्यामुळे आमदार निवासासाठी ९०० कोटी रुपये खर्च करण्याची गरज नाही. त्यातून सामान्यांना मदत करा, अशी विनंती करुणा मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांना केली आहे.

कोरोना कालावधीत राज्याच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी आपले फोन चालू ठेवावेत. ज्यांचे फोन येतील, त्यांचे फोन घ्यावेत. त्यांना हॉस्पिटल बेड आणि अन्य वैद्यकीय सुविधा तरी उपलब्ध करवून द्याव्यात. सार्वजनिक बाथरूमसारख्या सुविधा ज्या बांधून तयार आहेत, त्यांच्या उद्घाटनासाठी कोणाला वाट पाहायला लावू नका. यांसह अनेक मुद्दे त्यांनी लाइव्हमध्ये मांडले.

याच दरम्यान, करुणा धनंजय मुंडे यांनी त्यांची प्रेमकथा मांडणारे पुस्तक प्रकाशित करणार असल्याची माहिती दिली. त्याचे प्रमोशनही केले.

karuna dhananjay munde declears dhananjay mundes benglows, flats, farm houses and oppsed 900 cr MLA hostel

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात