विशेष प्रतिनिधी
मुंबई: कोरोना संकटकाळामध्ये अनेकांचे नुकसान झाले. अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले. त्याचबरोबर त्यांच्या पगारातही वाढ झाली नाही. अनेकांचे पगार कमी करण्यात आले. आता भारतातील कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी आली आहे. भारतामध्ये आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची मागणी वाढली आहे. त्यांच्या वेतनामध्ये ७०-१२० टक्के पगारवाढ होणार आहे. तसेच इतर अनेक लाभही मिळणार आहेत.
Job alert: Good news for IT companies. 70-120% increment in salary, bonus and many more benefits. Growth in Real Estate also
इनडीड जॉब्स ने दिलेल्या अहवालानुसार कोरोना महामारीच्या काळात आयटी कर्मचाऱ्यांची संख्या चारशे टक्क्यांनी वाढली. तसेच आयटी सेक्टरमधील कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली गेली. टीसीएस आणि इन्फोसिस सारख्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर भरती करण्याची घोषणा केलेली आहे. त्याचबरोबर आपल्याकडील कर्मचाऱ्यांची पगारवाढ केली आहे.
Core Sector Output : आठ कोअर सेक्टरमध्ये मे महिन्यात 16.8 टक्के वाढ, सरकारकडून आकडेवारी जाहीर
बंगळूर, पुणे आणि चेन्नई सारख्या मोठ्या शहरांमध्ये आयटी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ही नोकरी शोधणाऱ्या अनेकांसाठी एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राचाही अधिक फायदा होईल. त्याचबरोबर आयटी क्षेत्राने कर्मचाऱ्यांवर होणार्या खर्चामध्ये १.६-१.७ बिलियन डॉलरने वाढ केलेली आहे.
कोरोना महामारीमुळे जगभरामध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ चा ट्रेंड वाढला. यामुळे आधीच्या तुलनेत कर्मचार्यांवर केला जाणारा खर्च कमी झाला आहे. घरातूनच काम केले जात असल्यामुळे अन्न व इतर सोयी पुरवण्यासाठी कर्मचार्यांवर केला जाणारा खर्च कमी झाला आहे. त्यामुळे कंपन्यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App