उपमुख्यमंत्री जेथे जातात तेथून नोटांची बंडलेच घेऊन परततात, जेडीयू आमदाराचा आरोप


विशेष प्रतिनिधी

पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) आमदार गोपाल मंडल यांनी उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्यावर अवैध पैसे वसुलाचा आरोप केला आहे. यावरून बिहारमधील ‘जेडीयू’ व भाजपच्या आघाडी सरकारमध्ये कुरबुरी असल्याचे लक्षात येत आहे.JDU accuses Bihar Dy Cm

अवैध वसुली करणे हे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांचे कामच आहे. ते जेथे जातात तेथून नोटांची बंडलेच घेऊन परततात, असा आरोप मंडल यांनी जाहीररीत्या केला आहे. प्रसाद यांनी नुकताच भागलपूरचा दौरा केला होता. ‘‘ते अनेकदा हा दौरा करतात. केवळ पैसे वसुलीसाठी ते भागलपूरला जातात.



तेथे लोकशाही जनता दलाचे आमदार राजेश वर्मा यांच्या घरी प्रसाद हे भोजनासाठी गेले होते, याचा उल्लेख करीत मंडल म्हणाले की, वर्मा यांचा सोन्याचा व्यापार असल्याने त्यांनी सोन्यााच्या राशी उपमुख्यमंत्र्यांना दिल्या असतील. बिहारचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष संजय जायस्वाल यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. अशा निराधार आरोपांमुळे सत्ताधारी पक्षांच्या आघाडीवर परिणाम होईल, असे ते म्हणाले.

JDU accuses Bihar Dy Cm

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात