इंडोनेशिया, गापूर, मलेशिया, थायलंडमध्ये दहशतवादी हल्याचा जपानने दिला इशारा


वृत्तसंस्था

टोकियो : अग्नेय आशियातील सहा देशांमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असून या देशांमध्ये असलेल्या जपानी नागरिकांनी सावध रहावे, असा इशारा जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. इंडोनेशिया, फिलिपीन्स, सिंगापूर, मलेशिया, थायलंड आणि म्यानमार या देशांमध्ये हल्ला होण्याची शक्यता असल्याचे जपानने म्हटले आहे. Japan gave threat alert to 6 nations

या सहा देशांमध्ये आत्मघाती हल्ले होण्याचा धोका आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या जपानी नागरिकांनी आगामी काही काळ धार्मिक स्थळांपासून आणि गर्दीच्या ठिकाणांपासून दूर रहावे, असे जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेत म्हटले आहे.जपानच्या या इशाऱ्यानंतर संबंधित सहा देशांनी मात्र आश्चेर्य व्यक्त केले आहे. अशा प्रकारचा हल्ला होण्याची कोणतीही गोपनीय माहिती सरकारला मिळाली नसून जपान सरकारनेही माहिती दिलेली नाही, असे थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

फिलीपीन्सनेही हल्ल्याची शक्यता फेटाळून लावतानाच त्यांच्या देशातील जपानी नागरिकांनाही सावधानतेचा इशारा मिळाल्याचा इन्कार केला आहे. जपाननेही याबाबत माहिती देण्यास नकार दिला आहे, मात्र संबंधित सहा देशांमधील त्यांच्या दूतावासांमध्ये त्यांनी संभाव्य हल्ल्याबाबत सूचना पाठविल्या आहेत.

Japan gave threat alert to 6 nations

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण