लसीकरणात महाराष्ट्र देशात अव्वल, १.७९ कोटी जणांना लशीचा दुसरा डोस

विशेष प्रतिनिधी

मुंबई – कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने लसीकरण मोहिमेला गती दिली असून काल १४ लाख ३९ हजार ८०९ नागरिकांना लस देण्यात आली आहे.high vaccination in Maharashtra

राज्यात आतापर्यंत सहा कोटी ५५ लाख जणांचे लसीकरण झाले असून देशात सर्वाधिक एक कोटी ७९ लाख नागरिकांना लशीचा दुसरा डोस देऊन महाराष्ट्राने देशात विक्रम केला आहे.यापूर्वी २१ ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी ११ लाख चार हजार ४६५; तर ४ सप्टेंबर रोजी १२ लाख २७ हजार २२४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यानंतर १२ लाख लसीकरणाचा विक्रम मोडून काढत आज सुमारे १४ लाख ३९ हजार ८०९ जणांचे लसीकरण करण्यात आले. एका दिवसात झालेले हे आतापर्यंतचे सर्वाधिक लसीकरण असून आरोग्य यंत्रणेतील सर्व घटक यासाठी परिश्रम घेत आहेत.

high vaccination in Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या