जवानांना घेरून रायफल हिसकाविण्यासाठी ममतांनीच जमावाला चिथावले, अमित शहा यांचा आरोप

पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यात शनिवारी जवानांनी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला होता. यासाठी फक्त मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच जबाबदार आहेत. जवानांना घेराव करून त्यांच्याजवळील रायफल्स हिसकावण्यासाठी ममतांनी लोकांना चिथावले होते, असा स्पष्ट आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे.It was Mamata who provoked the crowd to surround the soldiers and snatch the rifle, Amit Shah alleged


विशेष प्रतिनिधी

नाडिया : पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यात शनिवारी जवानांनी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला होता. यासाठी फक्त मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच जबाबदार आहेत. जवानांना घेराव करून त्यांच्याजवळील रायफल्स हिसकावण्यासाठी ममतांनी लोकांना चिथावले होते, असा स्पष्ट आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे.

नाडिया जिल्ह्यात एका सभेत बोलताना अमित शाह म्हणाले, आतापर्यंत मुसलमानांचे तुष्टीकरण करीत आलेल्या ममता आता हिंसाचारात ठार झालेल्यांच्या घटनांवरही राजकीय पोळी शेकत आहेत. तुष्टीकरण हाच त्यांचा स्वभाव झाला आहे, असा आरोप त्यांनी केला.सीतलकुची येथील मतदान केंद्रावर तैनात असलेल्या जवानांना तुम्ही घेराव करा, त्यांच्या बंदुका पळवून न्या, असा सल्ला ममतांनी दिला नसता, तर ही घटना घडली नसती. मग, या चार लोकांच्या मृत्युसाठी ममता जबाबदार नाही का?

ममतांना या चार लोकांचा मृत्यू दिसतो, पण तिथेच आणखी एका तरुणाला समाजकंटकांनी गोळ्या घालून ठार मारले. आनंद बर्मन असे नाव असलेला हा तरुण भाजपाचा कार्यकर्ता होता आणि त्याला मारणारे तृणमूलचे गुंड होते.

जवानांच्या गोळीबाराचा फायदा घेत या गुंडांनी त्याला ठार मारले. या घटनेवर ममता गप्प का आहेत. त्याच्यासाठी त्यांनी सहानुभूती का व्यक्त केली नाही. तुष्टीकरणाचे राजकारण कुठे आणि कसे करायचे, हे ममतांना चांगले ठाऊक आहे.

सीतलकुची घटनेचे राजकारण करण्यासाठी ममतांनी जणू मोहीमच उघडली आहे, असा आरोप करताना, नागरिकांनी ममतांच्या चिथावणीखोर वक्तव्यांना बळी पडू नये. पहिल्या तीन टप्प्यांमध्ये जसे शांततेत मतदान झाले, तसेच उर्वरित टप्प्यांमध्येही होईल, याची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

It was Mamata who provoked the crowd to surround the soldiers and snatch the rifle, Amit Shah alleged

वाचा…