विशेष प्रतिनिधी
श्रीहरिकोटा – इस्रोच्या ‘इओएस-०३’ या उपग्रहाचे उड्डाण ‘जीएसएलव्ही-एफ १०’ या प्रक्षेपकाच्या साह्याने गुरुवारी यशस्वी झाले. मात्र तिसऱ्या टप्प्यातील प्रक्षेपकाच्या क्रायोजेनिक इंजिनमध्ये बिघाड झाल्याने उपग्रह भूस्थिर कक्षेत पोचू शकला नाही. ISRO launching failed
त्यामुळे ही मोहीम यशस्वी झाली नसल्याचे ‘इस्रो’ने जाहीर केले. मागील काही काळामधील ‘इस्रो’चा हा तिसरा प्रयत्न अपयशी ठरला. यापूर्वी ५ मार्च २०२० रोजी या उपग्रहाचे प्रक्षेपण होणार होते. मात्र प्रक्षेपणाच्या २६ तास आधीच ते रद्द करण्यात आले होते. त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला या उपग्रहाचे प्रक्षेपण होणार होते, पण काही तांत्रिक कारणाने ते पुढे ढकलण्यात आले होते.
उड्डाण नियोजनानुसार पहाटे पाच वाजून ४३ मिनिटांनी झाले. प्रक्षेपणानंतर चार मिनिटे व ५५ सेकंदाने दुसरा टप्पात पार पडला. उड्डाणानंतर साधारण नऊ मिनिटात प्रक्षेपकाने सुमारे १३० किलोमीटर एवढी उंची गाठल्यावर मोहिमेतील महत्त्वाच्या तिसऱ्या टप्प्याला व उपग्रहाला आणखी उंचीवर नेणारा क्रायोजेनिक इंजिनाचा टप्पा सुरू झाला. पण अवघ्या काही सेकंदातच या इंजिनासह उपग्रह नियोजित मार्ग भरकटत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर दहा मिनिटांनी इस्रोने मोहीम अयशस्वी ठरल्याचे जाहीर केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App