ISRO indigenous oxygen concentrator Shwas To Help India Fight Against Corona

कोरोनाविरुद्ध युद्धात ISROकडून ‘श्वास’ निर्मिती, स्वदेशी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमुळे एकाच वेळी दोन रुग्णांवर उपचार शक्य

ISRO Indigenous Oxygen Concentrator : देशातील कोरोना महामारीविरुद्धच्या युद्धात इस्रोनेही मोलाची भूमिका बजावली आहे. इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरने (VSSC) मेडिकल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बनविला आहे. ज्याला ‘श्वास’ असे नाव देण्यात आले आहे. हे उपकरण ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनचा समृद्ध स्तर 95 टक्क्यांहून अधिक ऑक्सिजनचा पुरवठा करेल. ISRO indigenous oxygen concentrator Shwas To Help India Fight Against Corona


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील कोरोना महामारीविरुद्धच्या युद्धात इस्रोनेही मोलाची भूमिका बजावली आहे. इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरने (VSSC) मेडिकल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बनविला आहे. ज्याला ‘श्वास’ असे नाव देण्यात आले आहे. हे उपकरण ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनचा समृद्ध स्तर 95 टक्क्यांहून अधिक ऑक्सिजनचा पुरवठा करेल.

इस्रोने तयार केलेल्या ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर प्रेशर स्विंग एडसॉर्पशनद्वारे हवेतून नायट्रोजन गॅस वेगळा करून ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून रुग्णांना प्रदान केला जातो. याद्वारे एक मिनिटात 10 लिटर ऑक्सिजन देण्याची क्षमता आहे. यामुळे एकाच वेळी दोन रुग्णांवर उपचार शक्य आहेत.

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन, प्रेशर आणि फ्लो रेटचा डिस्प्ले

महामारीच्या काळात इस्रोही देशसेवेसाठी पुढे आली आहे. यापूर्वी इनहाऊस मेडिकल टेक्नॉलॉजीव्यतिरिक्त मोठमोठ्या टँकद्वारे लिक्विड ऑक्सिजन पाठवण्यता आले. इस्रोने तयार केलेले हे कॉन्सन्ट्रेटर 600 वॉट पॉवरचे आहे जे 220V/50 हर्टझच्या व्होल्टेजवर चालू शकते. यात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन 95 टक्क्यांहून जास्त असेल. यात फ्लो रेट आणि कमी-अधिक शुद्धतेसाठी ऑडिबल अलार्मदेखील आहे. इस्रोने बनवलेल्या या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचेवजन 44 किलो आहे. याशिवाय ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन, प्रेशर आणि फ्लो रेटचा डिस्प्लेही आहे.

इस्रोच्या अभियंत्यांचे यश

विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या मते, वैद्यकीय उपकरणे तयार करणे इस्रोच्या कामाचा भाग नाही, कारण त्यासाठी मानसशास्त्राची सखोल समज आवश्यक आहे. श्वासाशी संबंधित उपकरणे तयार करणे डॉक्टरांच्या मदतीशिवाय अशक्य आहे. अशा परिस्थितीत इस्रोमध्ये काम करणाऱ्या अभियंत्यांनी या पूर्ण प्रक्रियेची माहिती घेतली, थिअरीचा अभ्यास केला आणि हे यंत्र विकसित करण्यात यश मिळवले.

इस्रोने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की, आपल्या अंतराळ संस्थेने केवळ रॉकेट सायन्समध्येच प्रभुत्व मिळवलेले नाही, तर कोणत्याही परिस्थितीत ते देशासोबत उभे राहण्यास पूर्णपणे सक्षम आहेत. आता इस्रोने हे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यासाठी अनेक उद्योगांना आमंत्रित केले आहे जेणेकरून असे स्वदेशी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स लवकरात लवकर मोठ्या संख्येने तयार करता येतील.

ISRO indigenous oxygen concentrator Shwas To Help India Fight Against Corona

महत्त्वाच्या बातम्या