वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आधुनिक तंत्रज्ञान आणि संरक्षणात सर्वात बलाढ्य राष्ट्र असे ज्याचे कौतुक करण्यात येते ते इस्त्रायल सायबर हल्ल्याचे शिकार झाले आहे. हा सायबर हल्ला चीनने केला असून बराच मोठा गोपनीय डेटा चोरल्याने जगात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे डेटा चोरल्यानंतर तो इराणने चोरला, असा आभास निर्माण करण्यात चिनी काहीसे यशस्वी झाले. परंतु त्यांचे बिंग आता फुटले आहे.Israel’s victim of China’s cyber attack, Data stolen; The needle of suspicion, however, is on Iran
चीनकडून इस्रायलवर आजपर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला करण्यात आला आहे. हॅकर्सनी सरकारी संस्था, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, आणि टेलिकॉम सेक्टरमधीलमहत्त्वाच्या डेटाची चोरी केली आहे. दरम्यान, अमेरिकी सायबर सिक्युरीटी कंपनी ‘फर्स्ट आय’नं यमागे चीनचा हात असल्याचा दावा केला. डेटामध्ये सर्वसामान्य युजर्सचा महत्त्वाचा आणि गोपनीय तपशीलही चोरला आहे. चीनचा सायबर ग्रुप UNC215 कडून हा हल्ला झाला आहे.
मायक्रोसॉफ्ट शेअरपॉइंटच्या जुन्या त्रुटींना निशाणा बनवत हॅकर्सनी इस्त्रायच्या सिस्टिमवर ताबा मिळवला आणि संवेदनशील डेटा चोरला. यापूर्वी अनेकदा इराणच्या हॅकर्सकडून इस्रायलवर सायबर हल्ले चढवले आहेत. त्यामुळे इराण आणि इस्रायल हे जुने प्रतिस्पर्धी असून एकमेकांना खिंडीत गाठण्याचा ते नेहमीच प्रयत्न करतात.
या हल्ल्याचा संशयदेखील इराणवर जावा, यासाठी हॅकर्सनी फारसी भाषेचा उपयोग केला. या हल्ल्याची चौकशीत इस्रायलला ही गोष्ट लक्षात येईल आणि त्यामुळे त्यांचा संशय इराणवर जाईल, अशी ही योजना होती. मात्र ती फ्लॉप झाली आणि अमेरिकेच्या सायबर सिक्युरिटी कंपनीकडून चीनची चोरी उघड झाली.
सायबर हल्ल्यांचा इतिहास
चीनकडून मध्य आशिया, युरोप, अमेरिका आणि आशियातील अनेक देशांच्या सायबर सिक्युरीटीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. आशिया खंडात वर्चस्व निर्माण करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे इस्रायल हा अमेरिकाधार्जिणा देश असल्यामुळेच काही गोपनीय माहिती चोरण्याचा प्रयत्न चीनचा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App