हिंदी भारताची राष्टभाषा आहे का? तेलगू व्यक्तीची न्यायालयात याचिका करून विचारणा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशाची राष्ट्रभाषा हिंदीला दक्षिणेकडील राज्यांमधून होणाºया विरोधाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे. हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.Is Hindi the national language of India? Petition of Telugu person in court

हैदराबादमधील एका तेलगू भाषिक व्यक्तीने ही याचिका दाखल करून हिंदीला राष्ट्रभाषा मानण्यावर आक्षेप घेतला आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने हिंदी हीच देशाची राष्ट्रभाषा असल्याचा निर्णय दिला आहे. त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.



याचिका दाखल करणाऱ्या तेलगू भाषिक नागरिकाचा टूर-ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने त्याची याआधीची याचिका फेटाळताना टूर-ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला राष्ट्रभाषेचा ज्ञान असायलाच पाहिजे, असे मत नोंदवले होते. याचिकाकर्त्याला हिंदी भाषा समजत नाही.

त्याला केवळ तेलगू भाषेचे ज्ञान असल्याचे म्हणणे त्याने मांडले होते. अंमली पदार्थ विरोधी सेलने त्याला ताब्यात घेतले होते. तपास अधिकाºयांनी त्याला फक्त तेलगु भाषा येत असतानाही चौकशीदरम्यान त्याच्या संवैधानिक हक्कांबाबत हिंदीमध्ये माहिती दिली होती. त्यावर त्याने आक्षेप घेत अमली पदार्थविरोधी कारवाईत जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता.

याचिकाकर्ता गंगम सुधीर कुमार रेड्डी यांचा टूर आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याला मुंबईतून अटक केली होती. रेड्डी यांच्या गाडीत मोठ्या प्रमाणात अवैध दारू सापडली होती. अमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांना संवैधानिक अधिकारांबद्दल हिंदीमध्ये माहिती दिली होती.

रेड्डी यांना फक्त तेलगू समजते. या प्रकरणी अंमली पदार्थविरोधी पथकाने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले की, यासंबंधीत संवैधानिक हक्कांची संपूर्ण माहिती केवळ राष्ट्रभाषेत देण्यात आली आहे. याचवेळी तपास पथकाने एनडीपीएस कायद्याच्या कलम 50 मधील तरतुदीचे पालन केले नसल्याचा दावा रेड्डी यांनी केला आहे.

दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने रेड्डी यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. तुमचा टूर आणि ट्रॅव्हलचा व्यवसाय आहे. तुम्हाला राष्ट्रभाषेचे ज्ञान असणे आवश्यकच आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला दिलासा देऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सुनावले होते.

मुंबई उच्च न्यायालयाने हिंदी हीच राष्ट्रभाषा असून नागरिकांना, विशेषत: टूर आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणाºयांन ही भाषा अवगत असलीच पाहिजे, असे म्हटले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की कलम 22(5) नुसार एखाद्या व्यक्तीला त्याच्या मूलभूत अधिकारांची माहिती त्याला चांगल्याप्रकारे समजेल अशाच भाषेत दिली जाणे आवश्यक आहे. त्यामुळे दोन उच्च न्यायालयाची भिन्न मते समोर आली आहे.

Is Hindi the national language of India? Petition of Telugu person in court

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात