लावण्याला न्याय मिळवून देण्यासाठी अभाविप कटिबद्ध, बळजबरी धर्मांतराच्याच्या विरोधात छात्रशक्ती देशभरात रस्त्यावर उतरेल – अभाविप


प्रतिनिधी

मुंबई : फेब्रुवारी तमिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात सेक्रेड हार्ट या माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या लावण्या या विद्यार्थीनीला ख्रिश्चन मिशनरींच्या धर्मांतराच्या दबावामुळे आत्महत्या करण्यास भाग पडले. लावण्याला न्याय मिळावा आणि जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराविरोधात कायदा करण्यात यावा यासाठी अभाविप चे सातत्याने प्रयत्न चालले आहे. Lavnya conversion issue ABVP will agitate over force conversion

लावण्या प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने दि.३१ जानेवारी रोजी या घटनेची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले. सीबीआय चौकशीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात तमिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

हे प्रकरण सीबीआय कडे चौकशीसाठी न जाऊ देण्याच्या तमिळनाडू सरकारच्या या कृत्यावरून त्यांची सदर प्रकरणाबाबत असंवेदनशीलता तसेच हे प्रकरण दडपून ठेवण्याचे चाललेले त्यांचे आटोकाट प्रयत्न चांगलेच लक्षात येत आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने १४ फेब्रुवारी रोजी तमिळनाडू सरकारची याचिका फेटाळून उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत हे प्रकरण सीबीआय कडे सोपविण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे लावण्याला न्याय नक्की मिळेल याबाबत आशा निर्माण होत आहे.

लावण्याला न्याय मिळावा आणि या जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराविरोधात कायदा करावा यासाठी अभाविप सातत्याने संघर्ष करत आहे. परंतु, तमिळनाडू सरकार आणि प्रशासन लावण्याच्या आत्महत्येचे प्रकरण दडपण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. एम.लावण्या च्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या आरोपींना जामीन मंजूर झाल्यानंतर कारागृहाबाहेर तमिळनाडू सरकार मधील मंत्री इनिगो इरूदयाराज यांच्याकडून आरोपींचे स्वागत करणे, हे देखील संतापजनक आहे. लावण्याला न्याय मिळावा म्हणून अभाविपचे कार्यकर्ते तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या घरासमोर शांततेत निदर्शने करत असताना तमिळनाडू पोलीसांनी त्यांच्यासोबत गैरव्यवहार करून अभाविप च्या राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी, राष्ट्रीय मंत्री मुथू रामलिंगम तसेच इतर उपस्थित कार्यकर्त्यांना जबरदस्ती अटक केली.

या सर्व प्रकरणात तमिळनाडू सरकारच्या असंवेदनशीलतेच्या विरोधात आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांना गैरव्यवहार करून अटक केल्याच्या विरोधात अभाविप निषेध व्यक्त करत आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय मंत्री प्रेरणा पवार म्हणालि, “तमिळनाडू सरकार पोलिसांच्या मदतीने लावण्याच्या आरोपींना वाचवण्याचे सर्व प्रयत्न करत आहेत. परंतु जोपर्यंत लावण्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत अभाविप तामिळनाडू मधील ‘द्रमुक सरकार’ विरोधात देशभरात रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील.”

अभाविप कोंकण प्रदेश मंत्री अमित ढोमसे म्हणाले, “धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्था वेगवेगळे आमिष देत आणि बळजबरीने शारीरिक व मानसिक छळ करत विद्यार्थ्यांना धर्मांतरण करण्यास भाग पाडत आहेत. विद्यार्थ्यांनी अश्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. लावण्याला न्याय मिळवणून देण्यासाठी अभाविप कटिबद्ध राहील.”

Lavnya conversion issue ABVP will agitate over force conversion

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”