क्रिकेटचा केंद्रबिंदू बदलला : अमित शहांच्या उपस्थितीत अहमदाबादच्या मोदी स्टेडियम मध्ये आयपीएल अंतिम सामना!!


वृत्तसंस्था

अहमदाबाद : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील अंतिम सामना आज रविवारी रात्री अहमदाबाद च्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये होणा-या या सामन्यात कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. विशेष म्हणजे या सामन्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील हजेरी लावणार असल्यामुळे या सामन्याला आता एक महत्व प्राप्त झाले आहे. शहांच्या उपस्थितीसाठी स्टेडियम परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. IPL final at the Modi Stadium in Ahmedabad in the presence of Amit Shah

कसोटी, एकदिवसीय आणि आयपीएल असे कोणतेही क्रिकेट सामने पूर्वी मुंबईत आणि महाराष्ट्रात केंद्रीभूत होऊन खेळवले जायचे. आयपीएल सुरू झाल्यापासून मुंबईतील वानखेडे, डी. वाय. पाटील स्टेडियम आणि त्यानंतर पुण्याजवळच्या गेहुंजे मधील स्टेडियम मध्ये अंतिम सामने व्हायचे. परंतु आता हा केंद्रबिंदू बदलला असून देशातले सर्वात मोठे स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद मध्ये असल्यामुळे तेथे आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.


IPL 2022 : आयपीएल स्पर्धा भारतातच होणार, मुंबईत खेळवले जातील सामने, प्रेक्षकांना नसेल प्रवेश


असा आहे बंदोबस्त

अंतिम सामन्याला अमित शहा यांच्यासह अनेक सिने कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सामन्याच्या सुरक्षेसाठी अहमदाबाद पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवणला आहे. स्टेडियम परिसरात 17 डीसीपी, 4 डीआयजीएस, 28 एसीपी, 51 पोलिस निरीक्षक, 268 पोलिस उपनिरीक्षक, 5 हजार पेक्षा जास्त पोलिस शिपाई, 1 हजार होमगार्ड आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या तीन तुकड्या तैनात ठेवण्यात आल्याचे अहमदाबाद शहराचे पोलिस आयुक्त संजय श्रीवास्तव यांनी सांगितले.

गृहमंत्र्यांचा गुजरात दौरा

28 मे पासून गृहमंत्री अमित शहा हे गुजरात दौ-यावर असून ते राज्यातील विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थिती दर्शवत आहेत. या त्यांच्या कार्यक्रमापैकीच 29 मे रोजी होणा-या आयपीलच्या अंतिम सामन्याचा देखील समावेश आहे.

IPL final at the Modi Stadium in Ahmedabad in the presence of Amit Shah

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात