WATCH : रबाडाचा खतरनाक फुलटॉस, युनिव्हर्स बॉस पाहतच राहिला अन् बोल्ड झाला

IPL स्पर्धेमध्ये दरवर्षी काही संघांचा बोलबाला पाहायला मिळत असतो. काही ठरावीक संघ हे चांगली कामगिरी करणार हे जवळपास स्पष्ट असतं. त्याला काही अपवाद असतात. पण जवळपास चित्र तसंच राहतं. त्यामुळं आपसुकच काही संघ हे यादीत खालच्या स्थानावर राहतात. असाच बहुतांश हंगामांमध्ये यादीत फार वरचं स्थान न मिळालेला किंवा विजेतेपदाच्या प्रतिक्षेत असलेला संघ म्हणजे दिल्ली कॅपिटल्स. यंदाच्या वर्षी मात्र दिल्लीच्या संघाचा जणू नूरच पालटला आहे. बॅटिंग, बॉलिंगसह ऑलराऊंड प्रदर्शन करत या संघानं यंदा अव्वल कामगिरी केलीय. स्पर्धा अर्ध्या टप्प्यावर आलेली असताना हा संघ गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर आहे. दिल्लीच्या गोलंदाजांचंही यात मोठं यश आले. दिल्लीच्या गोलंदाजांच्या यादीतील एक खास नाव म्हणजे कगिसो रबाडा. रविवारी पंजाब विरुद्धच्या साम्यात रबाडानं युनिव्हर्सल बॉसचा जो बोल्ड उडवला त्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे. IPL Chris Gayle get out on fultoss by Kagiso rabada

हेही वाचा –