भारताचे ब्रिटनला जशास तसे उत्तर, प्रवासी ब्रिटिशांसाठी नवे नियम, लस घेतलेली असूनही कोरोना चाचणी आणि क्वारंटाइन बंधनकारक

India new travel rules for uk nationals covid 19 rt pcr test on arrival at airport

India new travel rules for uk nationals : ब्रिटनच्या कोरोना प्रवासाचे नियम पाहता आता भारतानेही यूकेच्या नागरिकांसाठी नवीन प्रवास नियम जारी केले आहेत. नवीन नियमांनुसार, लस घेतल्यानंतरही ब्रिटिश नागरिकांना भारतात आल्यावर कोरोना चाचणी करावी लागेल. याशिवाय भारतात आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन म्हणजे विलगीकरणात राहणेदेखील बंधनकारक करण्यात आले आहे. India new travel rules for uk nationals covid 19 rt pcr test on arrival at airport


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ब्रिटनच्या कोरोना प्रवासाचे नियम पाहता आता भारतानेही यूकेच्या नागरिकांसाठी नवीन प्रवास नियम जारी केले आहेत. नवीन नियमांनुसार, लस घेतल्यानंतरही ब्रिटिश नागरिकांना भारतात आल्यावर कोरोना चाचणी करावी लागेल. याशिवाय भारतात आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन म्हणजे विलगीकरणात राहणेदेखील बंधनकारक करण्यात आले आहे.

वृत्तसंस्थेनुसार, हे नवीन प्रवासी नियम 4 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. यूकेमधून येणाऱ्या यूकेच्या सर्व नागरिकांना लागू होतील. या नवीन नियमांनुसार, ब्रिटिश नागरिकांना भारतात आल्यावर होम क्वारंटाइनमध्ये राहावे लागेल. ब्रिटिश नागरिकांना कोणतीही लस देण्यात आलेली असली तरी आरटीपीसीआर चाचणी करूनच त्यांना यावे लागेल. यानंतर मग भारतातही चाचण्या कराव्या लागतील. याशिवाय 10 दिवसांच्या विलगीरणातही राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.

यापूर्वी, ब्रिटननेही प्रवासी भारतीय नागरिकांना अशाच प्रक्रियेतून जावे लागणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर भारताने ब्रिटनला ही नवी नियमावली जारी करून जशास तसे उत्तर दिले आहे.

India new travel rules for uk nationals covid 19 rt pcr test on arrival at airport

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात