काश्मीरचा राग आळविणाऱ्या चीनला भारताने फटकारले; इस्लामिक राष्ट्रांची तिसरी आघाडी उभारण्याचा पाक-चीनचा कुटील डाव


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युद्धाची खुमखुमी चीनला आली आहे. सीमांचे विस्तारवादी धोरण आणि कुरापती काढण्यात अग्रेसर असणाऱ्या चीनने पाकिस्तानात सुरु असलेल्या इस्लामिक परिषदेत काश्मीरचा मुद्दा उकरून काढला आहे. त्यावरून भारताने तुमचा याच्याशी काही एक संबध नसल्याचे सांगून फटकारले आहे. India lashes out at China over Kashmir; Pak-China plot to build third front of Islamic nationsजम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. या उलट पाकिस्तानने काश्मीरचा भाग आणि चीनने अकसाई चीन हा भाग आपल्या ताब्यात ठेवला आहे. असे असताना इस्लामिक देशांच्या परिषदेत चीनने अकारण काश्मीर राग आळविला आहे.

रशिया युक्रेन युद्धात अमेरिका समर्थक राष्ट्र आणि रशिया समर्थक राष्ट्र असे दोन गट निर्माण झाले असताना पाकिस्तान, चीन हे देश जागतिक पातळीवर इस्लामिक राष्ट्रांना समवेत घेऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याचा दिशेने पावले टाकत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. दरम्यान, केंद्र शासित जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून त्यात चीनने लुडबुड करण्याची गरज नाही, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ठणकावले आहे.

India lashes out at China over Kashmir; Pak-China plot to build third front of Islamic nations

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण