काश्मीर पश्नात तोंड घालणाऱ्या चीनला भारताने फटकारले, आमच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष घालण्याची आवश्यकता नसल्याचे बजावले


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काश्मीर प्रश्नात मध्ये तोंड घालणाऱ्या चीनला भारताने फटकारले आहे. आमच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष घालण्याची आवश्यकता नसल्याचे बजावले आहे. पाकिस्तानमध्ये झालेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशनच्या बैठकीत चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी जम्मू-काश्मीरसंदर्भात केलेली वक्तव्ये अनावश्यक असल्याचे म्हणत फेटाळून लावली आहेत.India lashes out at China over Kashmir issue, Warned that do not need to pay attention to our internal affairs

जम्मू आणि काश्मीरसंदभार्तील सर्व मुद्दे हे पूर्णपणे देशांतर्गत विषय असल्याचेही भारताने म्हटले आहे.परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, उद्घाटन सत्राच्या भाषणादरम्यान चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी भारतासंदर्भात केलेली अनावश्यक वक्तव्ये आम्ही फेटाळून लावतो.जम्मू आणि काश्मीर संदभार्तील प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. चीनसह इतर कोणत्याही देशाला यावर भाष्य करण्याचा अधिकार नाही. भारत त्यांच्या अंतर्गत प्रश्नांवर सार्वजनिकरित्या भाष्य करणे टाळतो, हे त्यांना समजायला हवे.चीनचे परराष्ट्रमंत्री वांग बैठकीत म्हणाले होते की, काश्मीर संदर्भात आम्ही आज पुन्हा एकदा आमच्या इस्लामिक मित्रांचे बोलणे एकले. चीनलाही हीच अपेक्षा आहे.

India lashes out at China over Kashmir issue, Warned that do not need to pay attention to our internal affairs

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण