Farooq Khan Profile : 90च्या दशकात ठरले होते दहशतवाद्यांचा कर्दनकाळ, आता जम्मू-काश्मिरात भाजपचा चेहरा बनू शकतात माजी IPS फारुख खान


सुप्रसिद्ध माजी आयपीएस अधिकारी फारुख खान (वय 67) यांनी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या सल्लगारपदाचा नुकताच राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्याकडे त्यांच्या नव्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे. त्यांना भाजपमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे.Farooq Khan Profile Former IPS Farooq Khan can now be the face of BJP in Jammu and Kashmir


वृत्तसंस्था

श्रीनगर : सुप्रसिद्ध माजी आयपीएस अधिकारी फारुख खान (वय 67) यांनी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या सल्लगारपदाचा नुकताच राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्याकडे त्यांच्या नव्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे. त्यांना भाजपमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे.

90 चे दशक गाजवणारे माजी आयपीएस

माजी IPS अधिकारी फारुख खान यांचे 90च्या दशकात अतिकट्टरतवाद्याच्या काळात दहशतवादांविरुद्ध आखलेल्या त्यांच्या मोहिमांमुळे चर्चिले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी अनेकदा म्हटल्यानुसार, येथील विधानसभेच्या निवडणुका सीमांकनानंतर लवकरच होणार आहेत. फारुख खान यांचे सर्व समुदायांमध्ये, विशेषत: हिंदू आणि मुस्लिमांमध्ये समर्थक असल्याने, ते या केंद्रशासित प्रदेशात भाजपचा चेहरा बनण्याची दाट शक्यता आहे.



निवडणुकीच्या पूर्वार्धात अनेक घडामोडी घडत असताना खान यांचा राजीनामा आला आहे. गेल्या आठवड्यात सुरक्षेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शाह अनेक उच्चस्तरीय बैठकांसाठी जम्मूमध्ये होते. औपचारिक घोषणेची वाट न पाहता निवडणुकीची तयारी सुरू करण्याची सूचना आल्याचे भाजप नेत्यांनी मान्य केले.

फारुख खान यांना देशसेवेचा वारसा

जम्मू विभागातील डोगरी भाषिक पंजाबी मुस्लिम, खान यांचा जन्म एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा कर्नल पीर मोहम्मद यांनी डोगरा शासक महाराजा हरी सिंग यांच्या सैन्यात सेवा बजावली होती आणि 1947-48 मध्ये पाकिस्तानच्या आक्रमणाचा मुकाबला करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. कर्नल पीर मोहम्मद हे जम्मू-काश्मिरातील मधील भारतीय जनसंघाचे पहिले अध्यक्षदेखील होते. फारुख खान यांचे वडील सरदार मोहम्मद सरवर खान पोलीस अधीक्षक म्हणून निवृत्त झाले.

1980 च्या दशकाच्या मध्यात काश्मीर पोलीस सेवेतील अधिकारी म्हणून त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीपासून फारुख खान यांनी ठसा उमटवला होता. 1993च्या मध्यात जेव्हा दहशतवाद शिखरावर होता आणि सरकार निस्तेज झाले होते तेव्हा अतिरेक्यांशी सामना करणाऱ्या मूठभर अधिकाऱ्यांपैकी एक फारुख खानही होते.

दहशतवाद्यांचे बनले कर्दनकाळ

जेव्हा दहशतवादविरोधी कारवायांसाठी कमांडो सारख्या अधिकार्‍यांसह एलिट युनिटची गरज भासली तेव्हा त्यांनी तत्कालीन DGP MN सभरवाल यांच्या पूर्ण पाठिंब्याने 1995 मध्ये J&K पोलिस स्पेशल टास्क फोर्स (STF) ची स्थापना आणि नेतृत्व करण्यास मदत केली. त्याचे नंतर स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) असे नामकरण करण्यात आले. स्थानिक पोलिसांना दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सहभागी करून घेण्याची ही कल्पना होती.

STF चे प्रमुख म्हणून, खान यांच्या टीमने ऑक्टोबर 1994 मध्ये, 26 पंजाब रेजिमेंटसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत तीन अतिरेक्यांना ठार मारले. 1996 मध्ये हजरतबलवरील कारवाईत कोणतीही हानी न होता यश मिळवण्यात त्यांचाच वाटा होता. तीन दिवस चाललेल्या संघर्षात नऊ अतिरेकी आणि दोन पोलिस ठार झाले, तर 20 दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते.

तेहरीक-उल-मुजाहिदीन सारख्या दहशतवादी गटांचा जवळजवळ नाश करण्याचे श्रेय या दलाला देण्यात आले, त्याशिवाय प्रचंड शस्त्रे आणि स्फोटक साठा, कुपवाडा येथे पहिल्यांदाच विमानविरोधी शस्त्रे जप्त करण्यात आली, ज्यामुळे खान यांच्या नावाचे जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी गटांना कापरे भरू लागले होते.

आत्मसमर्पण केलेल्या दहशतवाद्यांच्या भरतीची कल्पना खान यांचीच

दहशतवादविरोधी कारवायांसाठी आत्मसमर्पण केलेल्या अतिरेक्यांची भरतीही खान यांचीच कल्पना होती. त्या वेळी भरती झालेल्यांमध्ये कुका परे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गट इखवान-उल-मुसलमून होता. असे सांगितले जाते की 1996 मध्ये J&K मध्ये सात वर्षांच्या अंतरानंतर लोकसभा निवडणुका झाल्या, त्यादरम्यान STF आणि विरोधी बंडखोरांनी एकत्रितपणे 2,000 हून अधिक अतिरेक्यांना ठार केले होते.

बनावट चकमकीचा वाद आणि निर्दोष सुटका

दरम्यान, खान यांना इखवानच्या न्यायबाह्य क्रियाकलापांसह त्यांच्या अनेक उपक्रमांमुळे वादाचाही सामना करावा लागला. 25 मार्च 2000 च्या पाथरीबल बनावट चकमकीत त्यांच्या कथित भूमिकेसाठी त्यांना 2003 मध्ये दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते, ज्यात लष्कराने अनंतनाग जिल्ह्यातील छत्तीसिंगपोरा गावात 36 शीखांच्या हत्याकांडासाठी जबाबदार असलेल्या पाच अतिरेक्यांना ठार मारल्याचा दावा केला होता. एका संबंधित घटनेत अनंतनागच्या ब्राकपोरा येथे SOG कर्मचार्‍यांनी 8 निदर्शकांना ठार केले होते.

हे पाच कथित अतिरेकी स्थानिक गावकरी असल्याचे नंतर निष्पन्न झाले. एका व्यक्तीच्या न्यायिक आयोगाने खान यांना हत्यांमध्ये सहभागी असल्याच्या आणि मारल्या गेलेल्यांच्या डीएनए नमुन्यांची फसवणूक केल्याच्या आरोपातून निर्दोष ठरवले होते. सीबीआयच्या तपासात नंतर राष्ट्रीय रायफल्सच्या सात जवानांना बनावट चकमकीसाठी जबाबदार धरण्यात आले होते.

पांडियन कमिशन आणि सीबीआय या दोघांकडून आरोपातून मुक्त झाल्यानंतर खान यांना पुन्हा नियुक्त करण्यात आले. त्यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण आणि जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयातदेखील संपर्क साधला होता. तत्कालीन गृह मंत्रालयाने त्यांना क्लीन चिट दिली.

2014 मध्ये केला भाजप प्रवेश, आता मिळणार मोठी जबाबदारी

खान 2013 मध्ये पोलिस महानिरीक्षक म्हणून निवृत्त झाले. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपशी ते महाविद्यालयात असतानापासून संबंधित होते. पुढच्याच वर्षी पक्षाचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांना नियुक्ती मिळाली. त्यांनी भाजपचे प्रवक्ते आणि राष्ट्रीय स्तरावरील भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे नागालँडमधील काम पाहिले.

नंतर, खान यांनी सप्टेंबर 2016-19 मध्ये लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशात प्रशासक म्हणून काम केले. 2017 मध्ये बेटांवर चक्रीवादळ आल्यानंतर ते तेथे मदत कार्याचे प्रभारी होते.

13 जुलै 2019 रोजी, त्यांना जम्मू-काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले . जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनल्यामुळे ते या पदावर राहिले आणि राज्यपालाची भूमिका प्रथम उपराज्यपाल जीसी मुर्मू आणि नंतर मनोज सिन्हा यांच्याकडे गेली.

खान यांनी यापूर्वी म्हटले आहे की, राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्ष विशेषतः काँग्रेस आणि जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी यांनी त्यांच्या स्वत:च्या स्वार्थासाठी मुस्लिमांची दिशाभूल केली आहे आणि आता गोष्टी बदलू लागल्या आहेत. यूपीमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर ते म्हणाले: “मुस्लिमांनी वास्तव पाहिले आणि सर्वसमावेशकता, समृद्धी, रोजगार, विकास आणि शांततापूर्ण वातावरणासाठी मतदान केले.”

भाजपवर होत असलेल्या आक्रमक हिंदुत्वाच्या आरोपावर खान म्हणतात की, “इस्लाम, ख्रिश्चन धर्माच्या बाजूने उभ्या असलेल्या इतर संघटना नाहीत का? केवळ हिंदू बहुसंख्य असल्यामुळे त्यांच्या बाजूने उभे राहणे हा गुन्हा आहे, असे तुम्ही म्हणू शकत नाही.”

Farooq Khan Profile Former IPS Farooq Khan can now be the face of BJP in Jammu and Kashmir

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात