ONE NATION ONE FLAG : 75 वर्षात प्रथमच फडकला तिरंगा ! कर्नाटकातील क्लॉक टॉवर-७०वर्ष इस्लामी ध्वज – खासदार मुनिस्वामींची शपथ अन् जिल्हाधिकारी,पोलिसांची साथ…


  • टॉवरचा हिरवा रंग पुसून पांढरा रंग ! पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त !
  • टॉवर वर तिरंगा फडकावला त्यानंतर राष्ट्रगीत देखील म्हंटले हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे .
  • गेली ७ दशके इस्लामी ध्वज फडकत रहायला कोलार भारतात आहे की पाकिस्तानात ? असा सवाल भारतीय विचारत आहेत.

विशेष प्रतिनिधी

कोलार (कर्नाटक) : कोलार जिल्ह्यातील ‘क्लॉक टॉवर’वर गेली ७५ वर्षे फडकत असलेला इस्लामी ध्वज काढून त्याऐवजी राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आहे.यासह या ‘टॉवर’ला दिलेला हिरवा रंग पुसून पांढरा रंग देखील देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली. या प्रसंगी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त होता. शीघ्र कृती दलाची एक तुकडीही तैनात करण्यात आली होती. ONE NATION ONE FLAG 75 years tiranga

 

काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार मुनीस्वामी एस्. यांनी ‘क्लॉक टॉवर’वरील इस्लामी ध्वज काढून तेथे राष्ट्रध्वज फडकावला जाईल’, असे आश्‍वासन दिले होते. वरील कारवाई झाल्यावर मुनीस्वामी यांनी ट्वीट करून म्हटले की, ७४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘विशेष समुदाया’चा ध्वज काढून तेथे राष्ट्रध्वज फडकवण्यात आला.

 

२. वर्ष १९३० मध्ये मुस्तफा नावाच्या एका व्यापार्‍याने हे ‘टॉवर’ उभारले होते.

जिल्हा अधिकाऱ्यांनी इस्लामिक झेंडे हटवल्यानंतर शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

नंतर, कोलार जिल्हा पोलिसांनी नव्याने सजवलेल्या क्लॉक टॉवरवर भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी स्थानिक मुस्लिमांसह जनतेला सहभागी करून घेतले.

या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, अनेक नेटकऱ्यांनी क्लॉक टॉवरवर ताबा मिळवल्याबद्दल जिल्हा अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.

तत्पूर्वी, कोलारचे लोकसभा खासदार मुनिस्वामी एस यांनी क्लॉक टॉवरवर फडकवलेले इस्लामी ध्वज बदलण्याची शपथ घेतली होती. त्या ठिकाणी तिरंगा फडकवला जाईल असेही ते म्हणाले होते

ONE NATION ONE FLAG 75 years tiranga

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण