लसीकरणात भारताने अमेरिका, चीनलाही मागे टाकले

लसीच्या उपलब्धतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात असलेल तरी भारताने लसीकरणाबाबत विक्रम केला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या 10 कोटीपेक्षा जास्त लसी देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारताला एवढ्या लसी देण्यासाठी केवळ 85 दिवस लागले.India has overtaken the US and China in vaccination


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : लसीच्या उपलब्धतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात असलेल तरी भारताने लसीकरणाबाबत विक्रम केला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या 10 कोटीपेक्षा जास्त लसी देण्यात आल्या आहेत. दुसऱ्यादेशांच्या तुलनेत भारताला एवढ्या लसी देण्यासाठी केवळ 85 दिवस लागले.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारताचा लसीकरणाचा वेग अमेरिकेपेक्षाही खूप जास्त आहे. एवढ्या वेळेत अमेरिकेत 9.2 कोटी आणि चीनमध्ये 6.14 कोटी डोस देण्यात आले होते.शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत संपूर्ण देशात एकूण 10.12 कोटी डोस देण्यात आले आहेत. 

केंद्र आणि राज्यांच्या एकत्र प्रयत्नांमुळे भारतातील मृत्यूदर (डेथ रेट) जगात सर्वात कमी 1.28 टक्के ऐवढो आहे.आतापर्यंत भारतात 90 लाख आरोग्य कर्मचाºयांना पहिला आणि 55 लाख जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. फ्रंटलाइन वर्कर्समध्ये ही संख्या 99 लाख आणि 47 लाख आहे.

45 ते 60 वर्षांच्या वयाच्या 3 कोटी लोकांना पहिला आणि 6 लाखांपेक्षा जास्त लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 3.95 कोटी लोकांना पहिला आणि 17.88 लाख जणांचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

भारताने पहिल्या टप्प्यामध्ये सर्व आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण 16 जानेवारीपासून सुरू केले होते. दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू झाला होता. यामध्ये 45 पेक्षा जास्त वयाच्या आजारी लोकांना आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणाºयांना लस देण्यात आली. यानंतर 2 एप्रिलपासून सुरू झालेल्या टप्प्यामध्ये 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वच लोकांना लसी देण्यात आल्या.

India has overtaken the US and China in vaccination

वाचा…