Corona Vaccine : मॉडर्नापाठोपाठ फायझरचीही कोरोवरील लस येणार, भारतात आतापर्यंत 4 लसींना मंजुरी

India has Approved four Corona Vaccine so far, Now After Moderna pfizer vaccine likely to be approved

Corona Vaccine : कोरोनाबरोबरच्या युद्धामध्ये देशाला आतापर्यंत 4 लसी मिळाल्या आहेत. कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक यांच्यानंतर मंगळवारी मॉडर्नाचीही लस मंजूर झाली. एवढेच नाही, तर लवकरच भारताला फायझरची लसदेखील मिळू शकते. नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी आरोग्य मंत्रालयाच्या मीडिया ब्रीफिंगदरम्यान ही माहिती दिली. ते म्हणाले, “आमच्याकडे सध्या कोव्हॅक्सिन, कोव्हिशील्ड, स्पुतनिक-व्ही आणि मॉडर्ना लस उपलब्ध आहे. लवकरच आम्ही लसीसाठी फायझरशीदेखील करार करू. याव्यतिरिक्त गर्भवती महिलांवर लसीच्या परिणामाबद्दल असलेला संभ्रमही त्यांनी दूर केला. India has Approved four Corona Vaccine so far, Now After Moderna pfizer vaccine likely to be approved


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाबरोबरच्या युद्धामध्ये देशाला आतापर्यंत 4 लसी मिळाल्या आहेत. कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक यांच्यानंतर मंगळवारी मॉडर्नाचीही लस मंजूर झाली. एवढेच नाही, तर लवकरच भारताला फायझरची लसदेखील मिळू शकते. नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी आरोग्य मंत्रालयाच्या मीडिया ब्रीफिंगदरम्यान ही माहिती दिली. ते म्हणाले, “आमच्याकडे सध्या कोव्हॅक्सिन, कोव्हिशील्ड, स्पुतनिक-व्ही आणि मॉडर्ना लस उपलब्ध आहे. लवकरच आम्ही लसीसाठी फायझरशीदेखील करार करू. याव्यतिरिक्त गर्भवती महिलांवर लसीच्या परिणामाबद्दल असलेला संभ्रमही त्यांनी दूर केला.

व्ही. के. पॉल म्हणाले की, कोरोना लसीपासून गर्भवती महिलांना कोणताही धोका नाही. त्यांना ही लस नक्कीच मिळाली पाहिजे. यासह, त्यांनी गर्भवती महिलांना लसीकरणासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर करण्याबद्दलही माहिती दिली. ते म्हणाले की, आतापर्यंत भारतात उपलब्ध असलेल्या 4 लसी स्तनदा महिलांसाठी सुरक्षित आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी लसीमुळे प्रजनन क्षमता कमी करण्याच्या अफवांनाही फेटाळून लावले. व्हीके पॉल म्हणाले की, असे काहीही नाही.

याशिवाय व्हीके पॉल यांनी कोरोनामधील नवीन डेल्टा प्लस व्हेरियंटबद्दलही दिलासादायक बातमी दिली. पॉल म्हणाले की, सध्या देशात 51 प्रकरणे आहेत. गेल्या आठवड्यात या प्रकारातील 50 प्रकरणे होती. या दृष्टिकोनातून, त्याच्या संक्रमणाची गती सध्या थांबलेली आहे. दुसरीकडे जर आपण लसीकरणाबद्दल बोललो तर देशातील 27 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येला कोरोना लसचा पहिला डोस मिळाला आहे. याव्यतिरिक्त 5.84 कोटी लोकांना दोन्ही डोस मिळालेले आहेत. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग गत महिन्याच्या तुलनेत झपाट्याने कमी होत आहे.

दरम्यान, देशात नोवाव्हॅक्स, झायडस कॅडिलाची लस यांचेही लवकरच उत्पादन सुरू होत आहे. या लसींनाही एक-दोन महिन्यात मान्यता मिळू शकते. यामुळे भारतात लसींची संख्या वाढणार असून यामुळे लसीकरणाच्या मोहिमेला मोठी गती येणार आहे.

India has Approved four Corona Vaccine so far, Now After Moderna pfizer vaccine likely to be approved

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात