वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. आता लसीकरणाचा वेग वाढवला असून विक्रमी लसीकरणाची नोंद होत आहे. cowin.gov.in वर गुरुवारी रात्री १२ वाजेर्यंत ६०.६३ लाख लोकांचं लसीकरणाचा डेटा अपडेट करण्यात आला. २१ जूनपासून सुरु झालेली मेगा व्हॅक्सिनेशन ड्राईव्हअंतर्गत गेल्या चार दिवसात २.७४ कोटी लोकांचं लसीकरण पार पडलं आहे. India Corona Vaccination: Vaccination of 6 million people a day in the country
21 जूनला ९०.८६ लाख
22 जूनला ५४.२२ लाख
23 जूनला ६४.८३ लाख
लसीकरणाची नोंद आहे. गुरुवारी सर्वात जास्त ८.५१ लाख लसीचे डोस उत्तर प्रदेशमध्ये देण्यात आले. याआधी २२ जूनला इकडाचा आकडा ८ लाखांहून जास्त होता. ७.४४ लाख लसीकरणासोबत मध्य प्रदेश दुसऱ्या स्थानावर आहे. मध्य प्रदेशमध्ये गेल्या ४ दिवसांत ३३लाखांहून अधिक लोकांचं लसीकरण पार पडलं. यातील अर्ध्याहून जास्त डोस म्हणजेच १७ लाख डोस २१ जूनला देण्यात आले.
लासीकरणात महाराष्ट्र, गुजरात आघाडीवर
याव्यतिरिक्त गुजरात आणि महाराष्ट्रात ४-४ लाखांहून अधिक लोकांचं लसीकरण पार पडलं. कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यात ३ लाखांहून अधिक लोकांचं लसीकरण झालं. देशाची राजधानी दिल्लीत केवळ १.५७ लाख लोकांना लस दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App