लसीकरणाबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्याचे सोनिया गांधींनीच उपटले कान, आता जयराम रमेश काय म्हणणार?


कॉँग्रेसचे नेते जयराम रमेश, शशी थरुर यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत संभ्रम पसरविला होता. अजूनही कॉँग्रेसचे अनेक नेते लसीकरणाबाबत अपप्रचार करत आहेत. मात्र, त्यांचे कान आता कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच उपटले आहेत.Sonia Gandhi slams those who create confusion about vaccination, now what will Jairam Ramesh say?


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कॉँग्रेसचे नेते जयराम रमेश, शशी थरुर यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत संभ्रम पसरविला होता. अजूनही कॉँग्रेसचे अनेक नेते लसीकरणाबाबत अपप्रचार करत आहेत. मात्र, त्यांचे कान आता कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच उपटले आहेत.

करोना लसीकरणाचा वेग वाढवा, लशी वाया घालवू नका, लसीकरणाबाबत लोकांच्या मनातील संभ्रम दूर करा अशा सूचना काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महासचिव व राज्य प्रभारींच्या बैठकीत दिल्या.



काही महिन्यांमध्ये करोनाची तिसरी लाट येण्याची भीती असून लहान मुलांना फटका बसू नये यासाठी काँग्रेस सरकारांनी जय्यत तयारी करावी, असेही आवाहन सोनिया गांधी यांनी केले.

कोरोना आपत्तीच्या हाताळणीवरून काँग्रेसने केंद्र सरकारला सातत्याने लक्ष्य बनवले आहे. दोन दिवसांपूर्वी करोनावरील श्वेतपत्रिकाही प्रकाशित करण्यात आली. पहिल्या व दुसऱ्या करोना लाटेतील केंद्राच्या गैरव्यवस्थापनावर टीकाही केली होती. त्यावर, काँग्रेसने सत्ता असलेल्या राज्यांमधील करोनाची वस्तुस्थिती तपासून पाहावी असे प्रत्युत्तर भाजपने दिले होते. या पार्श्वभूमीवर, सोनिया गांधी यांनी महासचिवांची बैठक घेतली असून लसीकरणाच्या प्रक्रियेत काँग्रेसने अधिक सक्रिय होण्याचा सल्लाही दिला.

लोकांमध्ये अजूनही लसीकरणाबाबत शंका असून त्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दूर केल्या पाहिजेत. लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असून आपापल्या भागांमध्ये अधिकाधिक लोकांचे लसीकरण केले जाईल याकडे लक्ष दिले पाहिजे. लसीकरणाचा वेग किमान तिपटीने वाढवला पाहिजे, अशी सूचनाही सोनिया गांधी यांनी दूरचित्रसंवादाद्वारे झालेल्या बैठकीत केली.

वर्षा अखेरपर्यंत देशातील ७५ टक्के लोकांचे लसीकरण होणे गरजेचे असून त्यादृष्टीने काँग्रेस पक्षाने सकारात्मक प्रयत्न करावेत. लशींच्या उपलब्धतेवर लसीकरण अवलंबून असले तरी काँग्रेसने केंद्र सरकारवर लसीकरणासाठी दबाव टाकला पाहिजे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

सोनिया गांधी यांनी हे आवाहन केले असले तरी जयराम रमेश, शशी थरुर यासारख्या नेत्यांनी भारत बायोटेकच्या स्वदेशी कोरोना व्हॅक्सिनबाबत अनेक शंका उपस्थित केल्या होत्या. लसीच्या चाचण्यांचे अहवाल प्रकाशित केले नाहीत असे म्हटले होते. त्यामुळे लस घ्यावी की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

Sonia Gandhi slams those who create confusion about vaccination, now what will Jairam Ramesh say?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात