भारताचे माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या नातवाचा भाजपमध्ये प्रवेश, हरदीप सिंह पुरी यांना दिले सदस्यत्व


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचे नातू इंद्रजीत सिंग यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या उपस्थितीत भाजप मुख्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, अशा वेळी इंद्रजीत सिंह भाजपमध्ये सामील झाले आहेत.Inderjeet Singh grandson of former President Giani Zail Singh joins BJP presence of Union Minister Hardeep Singh Puri

झैलसिंग 1982 ते 1987 पर्यंत राष्ट्रपती म्हणून कार्यरत होते. ते काँग्रेसचे सदस्य होते. ऑपरेशन ब्लू स्टार, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या आणि 1984 च्या शीखविरोधी दंगली त्यांच्या राष्ट्रपतिपदाच्या काळात घडल्या. झैलसिंग यांचा 1994 मध्ये एका कार अपघातात मृत्यू झाला.हरदीप सिंह पुरी म्हणाले, ‘या आव्हानात्मक काळात इंद्रजीत सिंह भाजपमध्ये सामील होत आहेत. यामुळे पंजाबमध्ये भाजप मजबूत होईल. त्यांच्या सहकार्याने, पंजाबबद्दल पंतप्रधान मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यातही मदत होईल. त्याचवेळी इंद्रजीत सिंह म्हणाले, ‘काँग्रेसने ग्यानी झैलसिंगजी यांना कशी वागणूक दिली आहे हे आपणा सर्वांना माहिती आहे

. ग्यानी झैलसिंगजी यांची फार पूर्वीपासून इच्छा होती की मी भाजपमध्ये जावे, आज मी त्यांचे स्वप्न साकार केले आहे. मी अटलजी, अडवाणीजी आणि मदनलाल खुराणाजी यांना ग्यानी झैलसिंहजींच्या सांगण्यावरून आधीच भेटलो आहे.

‘आज मी माझ्या आजोबांची इच्छा पूर्ण केली’

केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी नवी दिल्लीत इंद्रजीत सिंग यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. इंद्रजीत सिंह म्हणाले, ‘जेव्हा माझे आजोबा देशाचे राष्ट्रपती म्हणून निवृत्त झाले, तेव्हा त्यांनी मला राजकारणात येण्यास आणि भाजपचे दिग्गज अटलबिहारी वाजपेयी यांना भेटण्यास सांगितले.’ ते म्हणाले, ‘जेव्हा आजोबांचे निधन झाले, तेव्हा मी परत पंजाबला गेलो आणि विश्वकर्मा समाजासाठी काम करायला सुरुवात केली. आज मी आनंदी आहे की, मी माझ्या आजोबांची इच्छा पूर्ण केली.

यावेळी पुरी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात सुरू असलेल्या सत्तेच्या संघर्षाचा संदर्भ देत काँग्रेसवर निशाणा साधला आणि आरोप केला की तेथील सरकार केंद्र सरकारच्या अनेक महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी करत नाही. ते म्हणाले, ‘गृहनिर्माण योजना असो किंवा आयुष्मान योजना, राज्य सरकार त्यांची अंमलबजावणी का करत नाही हे मला समजत नाही.’

Inderjeet Singh grandson of former President Giani Zail Singh joins BJP presence of Union Minister Hardeep Singh Puri

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण