भविष्यात देशातील १०० टक्के वाहने इथेनॉलवर चालणार, पियुष गोयल यांनी सांगितली केंद्र सरकारची योजना


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अक्षय्य उर्जा क्षेत्राचा विकास करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे भविष्यात बॅटरीबरोबरच १०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहनेही विकसित केली जाणार असल्याची केंद्र सरकारची योजना असल्याचे पियुष गोयल यांनी सांगितले आहे.In the future, 100 per cent of vehicles in the country will run on ethanol, said Piyush Goyal

पियुष गोयल म्हणाले, केंद्र सरकारनं २०२३-२४ पर्यंत देशातलं इथेनॉल ब्लेडिंगचं उद्दीष्ट २० टक्के इतकं ठेवलं आहे. पण भविष्यात देशातील वाहनं १०० टक्के इथॅनॉलवर चालतील असे लक्ष्य केंद्र सरकारनं ठेवले आहे. येत्या काळात बॅटरी टेक्नोलॉजीची मागणी वाढणार आहे.अक्षय्य ऊर्जा सेक्टरमध्ये विकास होणार असून त्यामुळे बॅटरी इंडस्ट्रीमध्येही मोठा बदल होईल. अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करण्याचं उद्दीष्ट केंद्र सरकारनं ठेवलं असून भविष्यात वाहनं १०० टक्के इथेनॉलवर चालतील असं तंत्रज्ञान विकसीत करण्याचं काम आम्ही करत आहोत.

ज्यांच्याकडे इलेक्ट्रीक कार आहे अशांनी सौरऊर्जा किंवा अक्षय्य ऊर्जेच्या माध्यमातून चार्ज करावीत. यासाठी भविष्यात जास्तीत जास्त चार्जिंग स्टेशन्स उभारली जातील, असे सांगून गोयल म्हटले, २०२२ पर्यंत अक्षय्य ऊजेर्चं लक्ष्य १७५ गिगावॅट ठेवण्यात आले आहे. २०३० सालापर्यंत हेच लक्ष्य ४५० गिगावॅट इतके आहे.

५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इथेनॉल मिस्किंगचं लक्ष्य २०३० हून २०२५ पर्यंतचं केल्याची घोषणा केली आहे. याआधी इथेनॉलवर ब्लेंडिंगचं उद्दीष्ट २०२२ पर्यंत १० टक्के, तर २०३० पर्यंत २० टक्के इतके ठेवण्यात आलं होतं. आता यात पाच वर्षांची घट करण्यात आली आहे.

सध्या देशात पेट्रोलमध्ये ८.५ टक्के इथेनॉलचं मिश्रण केलं जात आहे. २०१४ साली हे प्रमाण फक्त १ ते १.५ टक्के इतके होते. देशात अक्षय्य ऊर्जा वापरातही मोठ्या प्रमाणात वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत तब्बल २५० टक्क्यांची वाढ या क्षेत्रात दिसून आली आहे. जगात अक्षय्य ऊजेर्चा वापर केल्या जाणाऱ्या प्रमुख पाच देशांमध्ये भारताचाही समावेश आहे.

मजबूत अर्थव्यवस्था आणि पर्यावरण अशा दोन्ही एकत्रित प्रयत्न करण्याचा सरकारचा निर्धार असून पर्यावरण बदलाच्या परफॉर्मंन्स इंडेक्समध्येही भारताचा टॉप-१० देशांमध्ये समावेश आहे, असंही गोयल यांनी यावेळी स्पष्ट केलं.

In the future, 100 per cent of vehicles in the country will run on ethanol, said Piyush Goyal

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण