महाराष्ट्र सरकारकडून ऑक्सिजनचे राजकारण, देशातील सर्वाधिक पुरवठा, पियुष गोयल यांची माहिती


केंद्राकडून महाराष्ट्राला देशात आतापर्यंत सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला आहे. सध्या देशात क्षमतेच्या 110% टक्के ऑक्सिजन निर्मिती सुरु असून औद्योगिक वापरासाठी उपलब्ध असलेला सर्व ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी वळवला जात आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली. याबाबत राज्य सरकारकडून केले जात असलेले राजकारण खेदजनक असल्याचे त्यांनी सांगितले.


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्राकडून महाराष्ट्राला देशात आतापर्यंत सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला आहे. सध्या देशात क्षमतेच्या 110% टक्के ऑक्सिजन निर्मिती सुरु असून औद्योगिक वापरासाठी उपलब्ध असलेला सर्व ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी वळवला जात आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली. याबाबत राज्य सरकारकडून केले जात असलेले राजकारण खेदजनक असल्याचे त्यांनी सांगितले. Maharashtra government playing politics on Oxygen, alleges Piyush Goyal

राज्यात सध्या ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळित झाला आहे. महाराष्ट्र सरकार त्यासाठी केंद्राकडे बोट दाखवत आहे. या पार्श्वभूमीवर गोयल म्हणाले, देशातली परिस्थिती लक्षात घेऊन देशात जास्तीत जास्त ऑक्सिजन निर्मिती होईल, यासाठी केंद्र सरकार सर्व संबंधित घटकांसोबत, पूर्ण प्रयत्न करत आहे. सध्या देशात एकूण क्षमतेच्या 110 टक्के ऑक्सिजन निर्मिती होत आहे.

तसेच औद्योगिक वापरासाठी असलेल्या सर्व ऑक्सिजनचा साठा वैद्यकीय वापराकडे वळवण्यात आला आहे. केंद्र सरकार, सर्व राज्यांच्या सतत संपर्कात असून, त्यांच्या आवश्यकता समजून घेत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही गोयल यांनी सांगितले.

कालच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्सिजनच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला आणि केंद्र आणि राज्याने या संकटकाळात परस्पर समन्वयाने काम करावे, अशी सूचना केल्याचे गोयल यांनी सांगितले.

या मुद्यावर राज्य सरकारकडून केल्या जात असलेल्या राजकारणबाबत खेद व्यक्त करत, महाराष्ट्राला आजवर देशात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा झाला आहे, अशी माहिती गोयल यांनी या दिली आहे.

Maharashtra government playing politics on Oxygen, alleges Piyush Goyal

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण