पंजाबमध्ये कॅ. अमरिंदरसिंग करणार भाजपसोबतच्या युतीची कप्तानी, विधानसभा निवडणुका एकशे एक टक्के जिंकणार असल्याचा विश्वास


विशेष प्रतिनिधी

अमृतसर : माझा पक्ष पंजाब लोक काँग्रेस आणि भाजप एकत्र निवडणुका लढवणार आहे. आमची युती पंजाब विधानसभेच्या निवडणुका एकशे एक टक्के जिंकणार असल्याचा विश्वास पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी व्यक्त केला. पंजाब भाजपचे अध्यक्ष गजेंद्र सिंह शेखावत यांनीही याला दुजोरा दिला आहे.In Punjab, Amarinder Singh will be the captain of the alliance with BJP, believing that he will win the assembly elections one hundred and one percent

नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी झालेल्या वादानंतर काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या कॅप्टन अमरिंदर यांनी उघडपणे भाजपसोबत युतीची घोषणा केली. पंजाबमध्ये कॅ. अमरिंदरसिंग यांना कॉँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते.



गांधी परिवाराने कॅ. अमरिंदरसिंग यांची बाजू ऐकू घेतली नाही. त्यामुळे कॅप्टन यांनी कॉँग्रेसला राज्यातून उखडून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.पंजाबमध्ये या आघाडीशिवाय काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि अकाली दल-बसप यांची आघाडीही रिंगणात आहे.

माजी मुख्यमंत्री सिंग म्हणाले, आमच्या दोन्ही पक्षांमध्ये बराच काळ चर्चा सुरु होती. पंजाब विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजप उमेदवारांना पाठिंबा देऊ. तसेच ते ही आमच्या  उमेदवारांना पाठिंबा देतील. मात्र, कोणता पक्ष किती जागा लढवणार याबाबत त्यांनी कोणतीही माहिती सध्या दिलेली नाही.

In Punjab, Amarinder Singh will be the captain of the alliance with BJP, believing that he will win the assembly elections one hundred and one percent

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात