महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमध्येही कॉँग्रेस आमदार बंडाच्य पावित्र्यात, आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांवर नाराज


विशेष प्रतिनिधी

रांची : प्रादेशिक पक्षांच्या मदतीने सत्तेचा तुकडा मिळालेला असतानाही कॉँग्रेसचे आमदार देशात सर्वत्रच बंडाच्या पावित्र्यात आहेत. महाराष्ट्रात कॉँग्रेस आमदारांनी थेट पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. आता झारखंडमधील आमदारांनीही आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांवर नाराजी व्यक्त करत बंडाचा झेंडा फडकाविला आहे. त्यामुळे हेमंत सोरेन यांचे सरकार अडचणीत सापडले आहे.In Maharashtra as well as in Jharkhand, Congress MLAs are angry with their own party ministers

झारखंडमध्ये सत्तारूढ झारखंड मुक्ती मोर्चाच्या (झामुमो) सोबत कॉँग्रेसचे सरकार आहे. या सरकारमध्ये कॉँग्रेसचा सहभाग अगदीच छोटा आहे. त्यामुळे मंत्र्यांनाही विशेष किंमत मिळत नाही. त्यामुळे आमदारांची कामे होत नाहीत. त्यामुळे आमदारांची आपल्याच पक्षातील मंत्र्यांविषयी नाराजी वाढली आहे.



काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांच्या नेतृत्वात नाराज आमदारांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी व सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला आहे. अन्सारी आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता यांचे कट्टर विरोधक आहेत. सभागृहातही त्यांना सतत विरोध करत असतात. आपल्याबरोबर नऊ आमदार आहेत, असा दावा इरफान यांनी केला आहे.

नाराज आमदारांमध्ये इरफान यांच्याबरोबरच उमाशंकर अकेला, नमन विक्सल कोंगाडी व राजेश कच्छप आहेत. त्यांना महिला आमदारांचेही समर्थन आहे. या सर्वांनी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे.आमच्या मंत्र्यांपेक्षा मुख्यमंत्री हेमंत सोरेन आमचे जास्त ऐकतात व कामेही करतात, असे आमदारांचे म्हणणे आहे. मात्र, सत्तारुढ झारखंड मुक्ती मोर्चामध्येही आलबेल नाही. या पक्षाच्या काही आमदारांनी बंडाचे निशाण फडकावले आहे.

In Maharashtra as well as in Jharkhand, Congress MLAs are angry with their own party ministers

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात