Sharad Pawar : शरद पवारांविरुद्ध असंतोष, आंदोलन नवे नाही; कांदा फेक, थप्पड आणि चप्पल फेक!!


संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी आज अचानक दुपारी शरद पवारांच्या सिल्वर ओक या घराबाहेर दगडफेक आणि चप्पल फेक करून आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.Dissatisfaction against Sharad Pawar, agitation is not new

मराठी प्रसार माध्यमांनी या सर्व गोष्टीचा ठपका महाराष्ट्राचे गृह मंत्रालय, मुंबई पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा ठेवला आहे. तर सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजप वर आरोप केला आहे. पण शरद पवार यांच्या विरोधात असंतोष आणि त्यांच्या विरोधातली आंदोलने ही बाब महाराष्ट्राला तरी अजिबात नवीन नाही.

शरद पवार हे केंद्रीय कृषिमंत्री असताना नाशिक जिल्ह्यातील निफाड मध्ये त्यांच्या जाहीर सभेत संतप्त शेतकऱ्यांनी कांदा फेक केली होती. त्यावेळी देखील असाच प्रचंड गोंधळ झाला होता. महाराष्ट्रातल्या त्या शेतकरी आंदोलनाचा राजकीय फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला होता.

त्यानंतर 2014 पूर्वी नवी दिल्लीतल्या एका कार्यक्रमातून शरद पवार हे भाषण करून बाहेर आले आणि एका संतप्त शीख युवकाने त्यांना थप्पड लगावली होती. त्यावेळी देखील देशभर या थप्पडेची राजकीय चर्चा झाली होती. या आंदोलकाच्या भावनेविषयी काही म्हणायचे नाही. पण आपल्याला वडिलांची काळजी वाटली होती. कारण शरद पवारांच्या चेहर्‍यावर त्यावेळी नुकतीच कॅन्सर विषयक शस्त्रक्रिया झाली होती, असे त्यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.आज देखील शरद पवार यांच्या मुंबईतल्या सिल्वर ओक निवासस्थानावर संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पल फेक केली. काही वेळात सुप्रिया सुळे बाहेर आल्या. त्यांनी हात जोडून एसटी कर्मचाऱ्यांना शांत राहण्याची विनंती केली. परंतु, संतप्त एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना आवरल्या नाहीत. सुप्रिया सुळे यांना देखील त्यांनी घेरण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी सुप्रिया सुळे यांना संरक्षण दिले. शांततेत मी चर्चा करायला तयार आहे. परंतु, मला आई, वडिलांची आणि माझ्या मुलीची काळजी वाटते त्यांना मी बघून येते आणि आपण चर्चा करू असे म्हणून त्या सिल्वर ओक मध्ये निघून गेल्या. परंतु त्या बाहेर येण्यापूर्वी पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांना बस मध्ये भरून सिल्वर ओक परिसरातून हलवले आणि त्यांना आझाद मैदानात सोडले.

एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी सिल्वर ओक परिसरातून बाहेर काढले. परंतु, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तोपर्यंत तेथे जमले होते. त्यांनी देखील भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी चालवली होती. या घोषणाबाजीतच आपण शांततेत चर्चा करायला तयार होतो, असे सुप्रिया सुळे यांनी सिल्वर ओक बाहेर येऊन पत्रकारांना सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांना संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्वर ओक वर केलेल्या दगडफेक आणि चप्पल फेक यामुळे शरद पवार यांच्या विरोधात झालेल्या कांदा फेक आणि थप्‍पड आंदोलनाची आठवण झाली.

कांदा फेक आंदोलन आणि थप्पड यानंतर काही दिवसांतच शरद पवार ज्या सरकारमध्ये होते अथवा ज्या सरकारच्या आधारस्तंभ होते ती सरकारे जनतेने विरोधी कौल देऊन पाडली होती. आता आजच्या आंदोलनानंतर आता सिल्वर ओक वरील दगडफेक आणि चप्पल फेकी नंतर त्याचे राजकीय परिणाम काय होतात?? पवार यांच्या नेतृत्वाखालच्या महा विकास आघाडी सरकारचे नेमके पुढे काय होते??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Dissatisfaction against Sharad Pawar, agitation is not new

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण