गाडी उशिरा आल्यास रेल्वे जबाबदार, द्यावी लागणार भरपाई, विमान चुकलेल्या प्रवाशाला मिळाले 30 हजार रुपये

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : रेल्वे गाड्यांना होणारा उशीर आता सगळ्यांच्या अंगवळणी पडला आहे. याबाबत दाद कोणाकडे मागायची आणि फिर्याद कोणाकडे करायची असेच वाटते.पण आता सर्वोच्च न्यायालयाने लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या विलंबाबाबत कठोर भूमिका घेत, म्हटले आहे की, गाड्यांच्या उशिरा येण्याने कोणत्याही प्रवाशाचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी रेल्वेची असणार आहे. यासाठी रेल्वेला प्रवाशांना भरपाई द्यावी लागेल.If the train arrives late, the Raiways will be responsible, compensation will have to be paid, the passenger who missed the flight got Rs 30,000

रेल्वेला उशीर प्रकरणी एका प्रवाशाला ३०,००० रुपये भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. “ट्रेनला उशीर झाल्यास रेल्वे आपली जबाबदारी झटकू शकत नाही. रेल्वे प्रवाशांना विलंबाचे कारण कळवण्यास अपयशी ठरली तर प्रवाशांना भरपाई द्यावी लागेल”,असा निकाल न्यायमूर्ती एम आर शाह आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने दिला आहे. प्रवाशांचा वेळ अमूल्य आहे आणि उशीर झाल्यास कुणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल,असे मत देखील सुप्रीम कोर्टातील खंडपीठाने नोंदवले.

संजय शुक्ला ११ जून २०१६ रोजी अजमेर-जम्मू एक्स्प्रेसने आपल्या कुटुंबासह प्रवास करत होते. ही ट्रेन सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी जम्मूला पोहोचणार होती. मात्र ट्रेन १२ वाजता नियोजित ठिकाणी पोहोचली. त्यामुळे १२ वाजता जम्मू विमानतळावरून सुटणारे विमान निघून गेले.

त्यामुळे कुटुंबाला जम्मू ते श्रीनगर असा प्रवास टॅक्सीने करावा लागला. या प्रवासासाठी त्यांना १५ हजार रुपये मोजावे लागले. तसेच हॉटेलमध्ये राहण्यासाठी १० हजार रुपयांचा वेगळा खर्च आला. या नाहक त्रासामुळे शुक्ला यांनी ग्राहक पंचायतीकडे धाव घेतली होती. यानंतर, अलवर जिल्ह्याच्या ग्राहक मंचाने उत्तर पश्चिम रेल्वेला संजय शुक्ला यांना ३०,००० रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

राज्य आणि राष्ट्रीय मंचानेही ग्राहक मंचाचा हा निर्णय कायम ठेवला. या निर्णयाला रेल्वेने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. रेल्वेकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी बाजू मांडली. रेल्वे कॉन्फरन्स असोसिएशन कोचिंग टॅरिफ क्रमांक २६ भाग-१ च्या नियम ११४ आणि ११५ नुसार गाड्यांच्या विलंबाची भरपाई देण्याची रेल्वेची कोणतीही जबाबदारी नाही,असा युक्तिवाद त्यांनी केला. पण न्यायालयाने त्याचा युक्तिवाद स्वीकारला नाही.

प्रयागराज एक्स्प्रेसला उशिरा झाल्याने दोन प्रवासी ५ तास उशिराने दिल्लीला पोहोचले होते. यामुळे कोचीला जाणारे विमान चुकले. यानंतर प्रवाशांनी ग्राहक पंचायतीकडे धाव घेत रेल्वे विरोधात तक्रार केली होती. ग्राहक पंचायतीने रेल्वेला दंड ठोठावला होता. त्यानंतर रेल्वेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायालयाने प्रवाशांच्या बाजूने निर्णय देत ४० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले होते. तर दुसरीकडे देशातील पहिल्या खासगी ट्रेन तेजस एक्स्प्रेसमध्ये ट्रेनच्या विलंबासाठी प्रवाशांना भरपाई देण्याची तरतूद आहे.

ट्रेन १ तास उशीर झाल्यास प्रत्येक प्रवाशाला १०० रुपये आणि ट्रेन दोन तास किंवा त्यापेक्षा जास्त उशीर झाल्यास २५० रुपये भरपाई देण्याची तरतूद आहे. अलीकडेच दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेस दोन दिवस उशिराने आली.

यावर, रेल्वे कंपनी IRCTC ने २,०३५ प्रवाशांना ४.५ लाख रुपये भरपाई म्हणून देण्याचा निर्णय घेतला होता.सार्वजनिक वाहतुकीला खाजगी क्षेत्राशी स्पर्धा करायची असेल, तर त्याला त्याची प्रणाली आणि कार्यशैली सुधारणे आवश्यक आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

If the train arrives late, the Raiways will be responsible, compensation will have to be paid, the passenger who missed the flight got Rs 30,000

महत्त्वाच्या बातम्या