रझा अकादमीवर बंदी घातली नाही तर हिंदू म्हणून रस्त्यावर उतरावे लागेल, नितेश राणे यांचा इशारा


हिंदूंना का मारल याचे उत्तर राज्य सरकार रझा अकादमीला का विचारत नाही असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. हिंदूवरचे अत्याचार आम्ही सहन करणार नाही. रझा अकादमीची कामे महाराष्ट्रात बंद झाली नाहीत तर आम्हाला हिंदू म्हणून रस्त्यावर उतरावे लागेल. मग स्वत:चे संरक्षण करण्यासाठी कोणत्याही टोकावर जाण्याची तयारी असेल, असेही असे नितेश राणे म्हणाले.If Raza Academy is not banned, we will have to take to the streets as Hindus, warns Nitesh Rane


विशेष प्रतिनिधी

मुंबई : हिंदूंना का मारल याचे उत्तर राज्य सरकार रझा अकादमीला का विचारत नाही असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. हिंदूवरचे अत्याचार आम्ही सहन करणार नाही. रझा अकादमीची कामे महाराष्ट्रात बंद झाली नाहीत तर आम्हाला हिंदू म्हणून रस्त्यावर उतरावे लागेल. मग स्वत:चे संरक्षण करण्यासाठी कोणत्याही टोकावर जाण्याची तयारी असेल, असेही असे नितेश राणे म्हणाले.

रझा अकादमी ही अतिरेकी संघटना आहे. दहशतवादी संघटना काम करतात तशी ही संघटना काम करत आहे. त्यामुळे रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणे म्हणाले, अमरावतीमध्ये १३ नोव्हेंबर रोजी हिंदू संघटनांनकडून काढण्यात आलेल्या मोचार्मुळे दंगल झाल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. १२ नोव्हेंबरला नांदेडला काढण्यात आलेला मोर्चा रझा अकादमीने काढला होता. यामध्ये त्रिपुरामध्ये जी घटना घडली त्यासाठी मोर्चा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. रझा अकादमीच्या लोकांनी एक फोटो दाखवावा की त्रिपुरामध्ये हिंदूनी मज्जीद पाडली असे मी त्यांना आव्हान देतो. मोर्चा काढण्याचे कारणच सत्य नव्हते. त्रिपुराच्या महासंचालकांनी तेव्हाच हे सत्य सांगितले होते. रझा अकादमीने शांतप्रिय मोर्चा काढायला हवा होता. हिंदूंना का मारलं याचे उत्तर राज्य सरकार रझा अकादमीला का विचारत नाहीत



रझा अकादमी ही अतिरेकी संघटना आहे हे मी फार जबाबदारीने म्हणतो आहे. जशा दहशतवादी संघटना काम करतात तशी ही संघटना काम करत आहे. मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे काम ही रझा अकादमी करत आहे. रझा अकादमी ज्यांनी सुरु केली ते अफगाणिस्तानातील आहेत. त्यांच्याकडून वेगळी काय अपेक्षा ठेवायची. तीन तलाकचा विरोध या रझा आकदमीने केला. मुस्लीम समाजाचा विकास होणे रझा अकादमीला मान्य नाही. त्यांनी करोना लसीकरणाला विरोध केला होता. फ्रांसच्या राष्ट्रपतीच्या भाषणाला देखील रझा अकादमीने विरोध केला.

देगलूरच्या मतदारांना आम्ही सांगत होतो काँग्रेसचा आमदार निवडून देऊ नका. देगलूरमध्ये जर भाजपाचा आमदार असता तर अशी दंगल घडली नसती. संरक्षण करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते पुढे असते. आज जिथे जिथे दंगल घडलेली आहे तिथे सर्व आमदार काँग्रेस, शिवसेना आणि एमआयएमचे आहेत. महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या मतदार संघामध्ये या सगळ्या दंगली भडकवल्या जात आहे याची नोंद महाराष्ट्रातील जनतेने घ्यावी, असे नितेश राणे म्हणाले.

१२ नोव्हेंबरला नांदेडला मोर्चा काढला त्याची जबाबदारी रझा अकादमीची होती. मोर्चाच्या माध्यमातून हिंदूंवर हल्ला करण्यात आला आणि त्यांची दुकाने फोडण्यात आली, असा आरोप करून राणे म्हणाले, त्रिपुरात मशिद जाळल्याची खोटी घटना असूनही महाराष्ट्रात दंगल घडवण्यात आली. याला उत्तर म्हणून हिंदू संघटना पुढे आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. रझा अकादमीवर बंदी घालण्यात यावी. रझा अकादमी ज्यांनी सुरु केली ते अफगाणिस्तानातील आहेत. महाराष्ट्र सरकारने त्यांना अटक करावी.

महाविकास आघाडीतर्फे भाजपा आणि इतर हिंदू संघटनांवर आरोप केले जात आहेत. १२ नोव्हेंबरला मोर्चा काढण्यात आला त्याची तयारी १० दिवसांपासून सुरु होती. रझा अकादमीवर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. तुम्हाला राज्यात जातीय दंगली घडवायच्या होत्या का? राज्यात वातावरण खराब करण्याचे काम या सरकारने केल्याचा माझा थेट आरोप आहे.

तुम्ही एक मोर्चा काढला तर आम्ही १० मोर्चे काढू हे रझा अकादमीने लक्षात ठेवावे,ह्व असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.हिंदूंना का मारल याचे उत्तर राज्य सरकार रझा अकादमीला का विचारत नाही असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. हिंदूवरचे अत्याचार आम्ही सहन करणार नाही. रझा अकादमीची कामे महाराष्ट्रात बंद झाली नाहीत तर आम्हाला हिंदू म्हणून रस्त्यावर उतरावे लागेल. मग स्वत:चे संरक्षण करण्यासाठी कोणत्याही टोकावर जाण्याची तयारी असेल, असेही असे नितेश राणे म्हणाले.

If Raza Academy is not banned, we will have to take to the streets as Hindus, warns Nitesh Rane

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात