हिंदूत्व सर्वांना बरोबर घेऊन चालते, समान संस्कृती असलेला समाज एक राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन


विशेष प्रतिनिधी

सुरत : समान संस्कृती असलेला समाज हा एक राष्ट्र आह. आपल्याला एकत्र उभे राहण्याची गरज आहे.हिंदुत्व म्हणजे जे सर्व लोकांसोबत एकजूटपणे चालतात. हिंदूत्व सर्वांना बरोबर घेऊन चालते असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.Hindutva carries with it all, a society with the same culture, states Mohan Bhagwat

सरसंघचालक दोन दिवसांच्या सुरत दौºयावर आहेत. भागवत उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि बुद्धिजीवींसह विविध लोकांना सुरत आरएसएस मुख्यालयात भेटले. शहरातील विज्ञान केंद्रात हिंदुत्वावर विचारवंतांच्या मेळाव्याला संबोधित केले. या वेळी ते म्हणाले, हिंदुत्वाचे तीन अर्थ आहेत- दर्शनिक, लौकिक आणि राष्ट्रियता (तत्वज्ञान, सांसारिक आणि राष्ट्रीय). सिंधू नदीच्या दक्षिणेला राहणारे हिंदू म्हणून ओळखले जातात. एक समान संस्कृती असलेला समाज हा एक राष्ट्र आहे. आपल्याला एकत्र उभे राहण्याची गरज आहे. हिंदुत्व म्हणजे जे सर्व लोकांसोबत एकजूटपणे चालतात.



डॉक्टर, इंजिनिअर, चार्टर्ड अकाउंटंट, प्राध्यापक, शिक्षक, वकील आणि विचारवंत यांच्यासह समाजातील विविध घटकांतील १५० हून अधिक लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. भागवत यांनी सर्व भारतीयांचा डीएनए एकच असल्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. मुस्लिम राष्ट्रीय मंचाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते म्हणाले होते की, सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. मग तो कोणत्याही धमार्चा असो. तसेच देशातील हिंदू-मुस्लिम एकता एक भ्रामक चर्चा आहे. कारण आम्ही वेगळे नाहीत, तर एकच आहोत. पूजा करण्याच्या पद्धतीवरून लोकांमध्ये भेद करणे चुकीचे आहे.

Hindutva carries with it all, a society with the same culture, states Mohan Bhagwat

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात