नाही – नाही म्हणत कॅप्टन साहेब पोहोचले अमित शहांकडे; पंजाबच्या राजकीय भूकंपाचा तिसरा अंक सुरू


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग हे दिल्लीमध्ये येऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटणार असल्याच्या बातम्या कालपासून येत होत्या. परंतु त्यांचा कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी सातत्याने इन्कार केला होता. परंतु आज सायंकाळी कॅप्टन साहेब अखेर नाही – नाही म्हणत अमित शहा यांच्या निवासस्थानी येऊन पोहोचले.Former Punjab CM and Congress leader Captain Amarinder Singh reaches the residence of Union Home Minister Amit Shah in New Delhi

दोन्ही नेत्यांमध्ये पंजाबचा राजकारणाविषयी महत्त्वपूर्ण चर्चा झाली असून काँग्रेस मध्ये सुरू असलेल्या बंडाळीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही वरिष्ठ नेत्यांची ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात होण्याची अटकळ असून त्यांच्याकडे महत्वपूर्ण असे कृषी खाते सोपविण्याची देखील दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. एकीकडे पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये प्रचंड घमासान माजली असताना राहुल गांधी मात्र सुदूर केरळमध्ये सावरकर आणि मोदींवर टीका करण्यात मग्न आहेत, तर कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासारखे अनुभवी नेते अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचून आपल्या आणि पंजाबच्या राजकीय भवितव्याचा निर्णय घेताना दिसत आहेत.

कॅप्टन अमरिंदरसिंग आणि भाजप यांचे समीकरण दोघांसाठी उत्तम राजकीय पर्याय असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. कारण कॅप्टन साहेबांकडे आता काँग्रेसचे कोणतेही राजकीय बॅगेज उरलेले नाही आणि भाजपचे पंजाबमध्ये स्वतंत्र अस्तित्व असले तरी फारसा प्रभाव नाही. अकाली दल आणि काँग्रेस आणि थोड्याफार प्रमाणावर आम आदमी पार्टी या तीन पक्षांमध्ये पंजाबचे राजकारण त्रिभाजित असताना कॅप्टन साहेब आणि भाजप यांची राजकीय युती पंजाबच्या राजकारणात चौथा कोन निर्माण करू शकेल अशी चिन्हे दिसत आहेत.

Former Punjab CM and Congress leader Captain Amarinder Singh reaches the residence of Union Home Minister Amit Shah in New Delhi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात