वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईचे पोलिस अधिकारी सचिन वाझे याचे अपील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या न्यायालयाने आज (NIA)फेटाळले आहे. त्यामुळे वाझे यांची तळोजा कारागृहाच्या रुग्णालयात रवानगी होणार हे स्पष्ट झाले. NIA court rejects dismissed Mumbai Police officer Sachin Waze’s appeal to be kept under house arrest.
सचिन वाझे याच्यावर हृदयशस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे विश्रांती हवी होती. त्यासाठी त्यांनी आपल्याला घरातच तीन महिने नजरकैदेत ठेवावे, अशी विनंती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या न्यायालयात केली होती. परंतु, न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळले असून ते रद्दबातलही केले. या निर्णयामुळे वाझे याना मोठा झटका बसला आहे. आता त्याची रवानगी तळोजा येथील कारागृहातील रुग्णालयात करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अंटेलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवणे, हिरेन मनसूखिया यांचा संशयास्पद हत्येत सहभाग, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी १०० कोटी वसुलीसाठी मदत करणे, असे गंभीर आरोप आहेत. याशिवाय पुन्हा नोकरीवर ठेवण्यासाठी शरद पवार यांचे मन वळविण्यासाठी अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपये मागितल्याने सांगणे, अशा गुतागुंतीच्या प्रकरणात वाझे गुंतले आहेत.
राज्यात भ्रष्टाचार शिष्टाचार झालाय का ?
दरम्यान, १०० कोटींच्या वसुली प्रकरणातील अनिल देशमुख आणि परमवीर सिंह दोघे गायब आहेत. त्यांना ईडीने चौकशीसाठी पाचारण केले. त्यानंतर ते हजर झालेले नाहीत. परमवीर सिंह यांनी तर देश सोडून नेपाळला पलायन केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असून अनिल देशमुखांचा ठावठिकाणा लागलेला नाहीं. राज्यातील अनेक मंत्री यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे एकामागून एक बाहेर पडत आहे.
आधी देशमुख नंतर अनिल परब, हसन मुश्रीफ, आनंद अडसूळ, भावना गवळी यांच्यावर आरोप झाले आहेत. तत्पूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीचे ५५ लाखांचे प्रकरण चव्हाट्यावर आले होते. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या १९ बंगल्याबाबत आरोप झाले होते. किरीट सोमय्या यांनी तर एकामागून महाविकास आघाडातील मंत्र्यांची प्रकरणे उघड करण्याचा धडाका लावला आहे. आता सुपात असलेले मंत्री भ्रष्टाचाराच्या जात्यात गेलेल्या मंत्र्यांना हसत आहेत. या प्रकरणाची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत.
ती खणून काढण्याची गरज आहे. राज्यात जणू भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे का ? असे आता जनतेला वाटू लागले आहे. दुसरीकडे आरोप झाले तर ते अजून सिद्ध झाले नाहीत, अशी हाकाटी पिटत आहेत. आरोप चव्हाट्यावर आल्यानंतर आणि सिद्ध झाल्यावर गायब किंवा नामा निराळे राहत आहेत. एकूणच सत्तेवरील मंडळी आता ‘निर्लज्जम सदासुखी’ झाली आहेत का ? , असे जनतेला वाटत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App