मुंबई, कोकणासह अनेक जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता, आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू; 4 जिल्ह्यांत अलर्ट

Maharashtra Rain updates IMD alert for Mumbai Thane Palghar Raigadh Konkan Marathwada Nasik Gulab Cyclone

Maharashtra Rain updates : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने आज मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये ३० ते ४० किमी प्रति तास वारे आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने पुढील ३-४ तास मुंबई, ठाणे आणि नाशिकसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. याशिवाय मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण विभागात पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’ हे चक्रीवादळ कमकुवत झाले असले तरी त्याच्या प्रभावामुळे पावसाची शक्यता वाढली आहे. Maharashtra Rain updates IMD alert for Mumbai Thane Palghar Raigadh Konkan Marathwada Nasik Gulab Cyclone


विशेष प्रतिनिधी

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने आज मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये ३० ते ४० किमी प्रति तास वारे आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने पुढील ३-४ तास मुंबई, ठाणे आणि नाशिकसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. याशिवाय मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण विभागात पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’ हे चक्रीवादळ कमकुवत झाले असले तरी त्याच्या प्रभावामुळे पावसाची शक्यता वाढली आहे.

काल रात्रीपासून मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सकाळी मुसळधार पाऊस झाला. यानंतरही अधूनमधून पाऊस सुरूच आहे. पुढील तीन ते चार तास जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडेल. हवामान खात्याच्या मते, पुढील तीन ते चार तास अहमदनगर आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठीही महत्त्वाचे आहेत.

अनेक गावे पाण्याखाली…

Maharashtra Rain updates IMD alert for Mumbai Thane Palghar Raigadh Konkan Marathwada Nasik Gulab Cyclone

मराठवाड्यातील नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसला आहे. परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गाव दुधना नदीकाठी आहे. गावात पुराचे पाणी शिरले आहे. गावातील जि.प. शाळेपर्यंत हे पाणी आले आहे. याशिवाय दुधना नदीकाठच्या शेतांमध्येही पाणीच पाणी झाले आहे. काढणीला आलेल्या सोयाबीनला जलसमाधी मिळाली आहे. गावातील शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे.

 

48 तासांत 37 जणांचा मृत्यू, 8 जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान

महाराष्ट्रात संततधार पावसामुळे गेल्या 48 तासांत 37 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 200 पेक्षा जास्त जनावरे पुरात वाहून गेली आहेत. यवतमाळमध्ये काल बस वाहून गेल्यानंतर तीन प्रवासी ठार झाले आणि चालक बेपत्ता असल्याची माहिती आहे. नाशिकमधील गंगापूर धरणातून 5000 क्युसेक पाणी सोडण्यात आल्यानंतर गोडा घाट आणि रामकुंड भागात पूर आला आहे. रामकुंडातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.

आजही दुपारी 12च्या सुमारास गंगापूर धरणातून 15000 क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदाघाटच्या लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बीड, जालना आणि हिंगोली या आठ जिल्ह्यांमध्ये पिकांचे खूप नुकसान झाले आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे 7000 कोटींची मदत मागितली आहे.

मराठवाड्यातील सर्व 11 जिल्ह्यांत एनडीआरएफची प्रत्येकी एक टीम तैनात आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांत विशेषत: मराठवाडा, मुंबई आणि कोकण भागात असाच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. कोकणात अधिक पाऊस अपेक्षित आहे, विशेषत: रत्नागिरी आणि उत्तर कोकण भागात. याशिवाय विदर्भामध्येही पावसाची तीव्रता कायम राहील. हवामान विभागाने कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यातील सर्व 11 जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफची प्रत्येकी एक टीम तैनात करण्यात आली आहे. एनडीआरएफच्या टीमने आतापर्यंत पुरात अडकलेल्या 560 जणांना वाचवले आहे.

घर न सोडण्याचा सल्ला

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात विजांसह मुसळधार पाऊस पडेल. वारेही वेगाने वाहतील. गरज नसताना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.

Maharashtra Rain updates IMD alert for Mumbai Thane Palghar Raigadh Konkan Marathwada Nasik Gulab Cyclone

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात